For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता पिनशिवाय पेमेंट करता येणार

06:40 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आता पिनशिवाय पेमेंट करता येणार
Advertisement

फिंगरप्रिंट आणि फेस स्कॅनवर काम करता येणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आता युपीआयद्वारे पेमेंट करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. तुम्ही तुमचा युपीआय पिन विसरल्यास, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) ने एक नवीन फीचर आणले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनच्या फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅनचा वापर करून 5,000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता.

Advertisement

म्हणजेच, प्रत्येक वेळी पिन टाकण्याची गरज नाही. ही सुविधा भिमी अॅपपवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन या नावाने आणण्यात आली आहे. ज्यांना पिन आठवत नाही किंवा ज्यांना वारंवार पिन टाकायचा नाही, त्यांच्यासाठी हे विशेषत: उपयुक्त आहे. यामुळे पेमेंट करणे सोपे, जलद आणि अधिक सोयीस्कर होईल.

ही नवीन सुविधा युपीआय वापरकर्त्यांसाठी कशी फायदेशीर आहे?

ही सुविधा अशा परिस्थितीत खूप उपयुक्त आहे, जिथे वापरकर्ता आपला युपीआय पिन विसरतो किंवा चुकीचा पिन टाकतो, ज्यामुळे पेमेंट अयशस्वी होते. आता ही समस्या टाळता येईल. याच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट, क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे किंवा मित्र आणि कुटुंबीयांना पैसे पाठवणे सोपे होईल. एकंदरीत, हे वैशिष्ट्या दैनंदिन डिजिटल पेमेंट अधिक सोपे आणि विश्वसनीय बनवते.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजे काय?

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हे एक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या शरीराशी संबंधित वैशिष्ट्यांद्वारे (जसे की बोटांचे ठसे किंवा चेहरा) केली जाते. या नवीन वैशिष्ट्याअंतर्गत, वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनच्या बोटांच्या ठशांचा किंवा चेहऱ्याच्या स्कॅनचा वापर करून 5,000 रुपयांपर्यंतचे युपीआय  पेमेंट करण्याची सेवा उपलब्ध होऊ शकते.

Advertisement
Tags :

.