आता युट्यूब ॲॅपवरून ‘शॉर्टस्’ काढता येणार
युट्यूबचे ‘टाईम मॅनेजमेंट“ नावाचे नवे फिचर बाजारात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यूट्यूबने ‘टाईम मॅनेजमेंट“ नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. याच्या मदतीने तुम्ही आता अॅपवर शॉर्ट्स पाहण्यासाठी वेळेची मर्यादा ‘शून्य“वर सेट करू शकता. यामुळे शॉर्ट्स फीड पूर्णपणे काढून टाकला जाईल. क्रीन टाईमचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यास मदत करणे हा याचा उद्देश आहे. यूट्यूबने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शॉर्ट्ससाठी एक टायमर फीचर सादर केले होते, ज्याची किमान वेळ मर्यादा 15 मिनिटे होती. जानेवारीमध्ये, पालकांना मुलांच्या क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी ‘शून्य मिनिटे“ (झिरो मिनिट्स) या पर्यायासह हे फीचर विस्तारित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
सर्व खात्यांसाठी फीचरची सुरुवात
यूट्यूबच्या प्रवक्त्या मॅकेन्झी स्पिलर यांच्या म्हणण्यानुसार, हा पर्याय आता सर्व पालकांसाठी उपलब्ध आहे आणि हळूहळू सामान्य प्रौढ खात्यांसाठी देखील आणला जात आहे. बिंज वॉचिंग आणि रीलच्या व्यसनावर मदत होईल. भारतात यूट्यूबचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत आणि शॉर्ट्सची क्रेझ प्रचंड आहे. त्यामुळे, ज्या लोकांना डूम क्रोलिंगची म्हणजेच अनावश्यक क्रोलिंगची सवय मोडायची आहे, त्यांच्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरेल. डिजिटल वेल-बीइंगच्या दिशेने यूट्यूबचे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
एकाग्रता आणि उत्पादकता:
जे विद्यार्थी केवळ व्यावसायिक कामाचे लांबलचक ट्युटोरियल्स पाहण्यासाठी यूट्यूबवर येतात, होम क्रीनवरून शॉर्ट्सच्या सूचना काढल्या जातील तुम्ही ‘शून्य मिनिट“ मर्यादा निवडताच, शॉर्ट्स टॅबवर कोणताही व्हिडिओ दिसणार नाही. तुम्ही तुमच्या ‘शॉर्ट्स फीड लिमिट“ पर्यंत पोहोचला आहात, अशी फक्त एक सूचना दिसेल. मर्यादा निश्चित केल्यानंतर, होम क्रीनवरून शॉर्ट्सच्या सूचना देखील हटवल्या जातील.
मुलांसाठी सुरक्षित:
पालक आता मुलांच्या फोनवर शॉर्ट्स पूर्णपणे ब्लॉक करू शकतील, जेणेकरून ते फक्त परवानगी असलेला कंटेंटच पाहू शकतील.
उत्तम वापरकर्ता अनुभव:
अॅपची होम क्रीन अधिक स्वच्छ असेल. जर तुम्हाला शॉर्ट्स आवडत नसतील, तर तुम्हाला यापुढे फीडमधील व्हिडिओ थंबनेल्स पाहण्यास भाग पाडले जाणार नाही.
फीचर चालू करण्यासाठी 3 पायऱ्या फॉलो करा:
यूट्यूब अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘टाइम मॅनेजमेंट“ पर्याय निवडा.
आता ‘शॉर्ट्स फीड लिमिट“ चालू करा. टाइम लिमिटमध्ये जाऊन ‘0 मिनिटे“ निवडा.
ज्ञान भाग: डूमक्रोलिंग म्हणजे काय?
डूमक्रोलिंग म्हणजे सतत छोटे व्हिडिओ क्रोल करण्याची सवय. यामुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही, तर मानसिक ताण आणि निद्रानाश यांसारख्या समस्याही वाढू शकतात.