For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | तू खेड्यातील आहेस..." लग्नानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ; पुण्याच्या चव्हाण कुटुंबावर सांगलीत गुन्हा दाखल!

06:09 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   तू खेड्यातील आहेस     लग्नानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ  पुण्याच्या चव्हाण कुटुंबावर सांगलीत गुन्हा दाखल
Advertisement

                           ‘तू खेड्यातील आहेस’ म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

Advertisement

सांगली : लग्रानंतर अवघ्या काहीदिवसांतच विवाहितेला "तू खेड्यातील आहेस,' असे म्हणत माहेरहून रोकड आणि दुचाकी आणण्यासाठी दबाव टाकत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ७ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत पुण्यातीलसदाशिव पेठ परिसरात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संजना ओमकार चव्हाण यांनी फिर्याद दिली.

Advertisement

पोलिसांनी ओमकार अनंत चव्हाण, पूजा अनंत चव्हाण, अनंत माधव चव्हाण, विनायक माधव चव्हाण आणि रेखा विनायक चव्हाण (सर्व रा. कलावती निवास, सदाशिव पेठ, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीनुसार, संजना यांचा विवाह ओमकार चव्हाण याच्याशी झाला होता.

Advertisement
Tags :

.