योगिता बिहानी रिलेशनशिपमध्ये
अर्चना पूरन सिंहच्या पुत्रासोबत डेटिंग
अभिनेत्री अर्चना पूरन सिंह स्वत:च्या परिवारासोबत सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. तिचा पुत्र आर्यमन देखील युट्यूबवर रेग्युलर व्लॉगद्वारे चाहत्यांसोबत जोडलेला असतो. आर्यमनने आता योगिता बिहानी या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली आहे. योगिता ही चित्रपट ‘द केरळ स्टोरी’साठी ओळखली जाते. योगिताने रिलेशनशिपची वाच्यता करण्याची अनुमती दिल्यानेच ही घोषणा करत असल्याचे आर्यमनने स्पष्ट केले आहे. मी माझ्या जीवनातील सर्वात चांगला काळ जगत आहे. पाणीपुरी डेटपासून मजेशीर गेम्स खेळणे, शॉपिंग करणे आणि अन्य गोष्टींद्वारे आम्ही परस्परांसोबत वेळ घालवत आहोत, असे आर्यमनने सांगितले आहे. योगितासोबत मी आकर्षक डेट एन्जॉय करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. आर्यमन बॉलिवूडमध्ये काम करू पाहत आहे. पुढील काळात तो बॉलिवूडमध्ये दिसून येऊ शकतो. तर योगिता अनेक चित्रपटांमध्ये दिसून येईल.