For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शेटे वाड्यात योगदंडाची पूजा

06:44 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शेटे वाड्यात योगदंडाची पूजा
Advertisement

                      शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचे पूजन

Advertisement

सोलापूर : सिद्धेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीस शनिवारी योगदंडाच्या पूजनाने प्रारंभ झाला. सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची विधिवत पूजा शनिवारी दुपारी शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात अॅड. रितेश थोबडे यांच्या हस्ते करण्यात आली.

योगदंडाच्या पूजनाने सिद्धेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधीस प्रारंभ झाला. यानिमित्त वाड्यास झेंडू, शेवंतीच्या फुलांनी सजविण्यात आले होते.अक्षता सोहळ्याच्याआधी नववधू-वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवू घालण्याची प्रथा आहे. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी कसब्यातील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते. तीच परंपरा कायम ठेवून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडास केळवणासाठी शेटे यांच्या वाड्यात आणून, केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे विधिवत पूजा केली जाते. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मानकरी शिवशंकरकंठीकर उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले.

Advertisement

यावेळी मानकरी हिरेहब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडास विभुती, कुंकुम, फुले वाहून संबळाच्च्या निनादात पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन करण्यात आले. शेटे यांचे वारसदार व अॅड. मिलिंद थोबडे त्यांचे चिरंजीव अॅड. रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली. केळीच्या पानामध्ये योगदंडास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी अॅड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.