For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक

10:24 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक
Advertisement

माहिती खात्यातर्फे पत्रकारांसाठी योग शिबिर

Advertisement

बेळगाव : माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते व ओम योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वार्ता भवनमध्ये शनिवारी पत्रकारांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक आहे. योग हाच सहकारी, असे प्रशिक्षक विजय कदम यांनी सांगितले. ओम योग साधना संस्थेचे विजय कदम यांनी दररोजच्या कामाच्या व्यापामध्ये अत्यंत कमी वेळेत योगाभ्यास करण्याची पद्धत सांगितली. चालणे, योगाभ्यास, योग्य आहार यामुळे आपले आरोग्य उत्तम राखू शकतो. कामाचा कितीही व्याप असला तरी योग करणे आवश्यक आहे. पाठदुखी, गुडघेदुखी, मानदुखी हे आजार योगाद्वारे दूर करू शकतो. या संदर्भातील सोप्या योग पद्धती त्यांनी करून दाखविल्या. माहिती खात्याचे उपनिर्देशक गुरुनाथ कडबूर म्हणाले, पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 17 रोजी वार्ता खात्याच्या कार्यालयात सकाळी 6.30 वाजता शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात पत्रकारांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा. या शिबिरात अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.