कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी योगा आवश्यक - साधना गुरव

04:26 PM Jan 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सूर्यनमस्कार दिन साजरा

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
योगामध्ये सूर्यनमस्कार प्रकाराला विशेष स्थान असुन आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले. सूर्यनमस्कार दिनानिमित सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुष् विभागअंतर्गत मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सूर्यनमस्कार बाबत मार्गदर्शन करतांना साधना गुरव बोलत होत्या. यावेळी डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ धीरज सावंत, डॉ निखिल अवधूत, डॉ निलेश अटक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी डॉ. निलेश अटक यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि दैनंदिन आवश्यकता व मानसिकता याबद्दल बहुमोल माहिती देऊन सूर्यनमस्कार या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित योगसाधकांनी सूर्यनमस्काराच्या १२ आवर्तनाची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांनी रोज सूर्य नमस्कार करण्याचे आवाहन केले.यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व विभागाचे इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा विभागाचे इन्चार्ज आणि कर्मचारी, कार्यालय प्रमुख सौ येळेकर, एन सी डी विभागाच्या सौ कशाळकर,आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ सागर जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article