योग ही भारताने जगाला दिलेली देणगी
शहरात विविध संस्थांच्यावतीने योग दिन साजरा : योगासनाची प्रात्यक्षिके सादर : विविध ठिकाणी व्याख्यानांवर भर
बेळगाव : योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार रविवारी शहरात योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत याबरोबरच शाळा, कॉलेज, विद्यापीठ, विविध संस्था, संघटना, युवक मंडळ, महिला मंडळ यांच्यावतीने योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. योगासनाची प्रात्यक्षिके, ध्यानाचे महत्त्व, व्याख्यान आदी उपक्रमांनी हा दिवस पार पडला.
योग दिनानिमित्त एक्स्ट्रीम सिक्युरिटीमध्ये योग, टेकिंग उपक्रम
जागतिक योग दिनानिमित्त एक्स्ट्रिम सिक्मयुरिटीच्यावतीने येळ्ळूर येथील राजहंसगड परिसरात कर्मचाऱ्यांसाठी विशेष योग सत्र व टेकिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. येळ्ळूर गावापासून राजहंसगडाच्या शिखरापर्यंत गडारोहण केल्यानंतर सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर योगासने, प्राणायाम व आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यशवंत पाटील व माऊती पाटील यांनी योगाचे महत्त्व व निरोगी जीवनशैलीची गरज यावर मार्गदर्शन केले. ऊद्रगौडा कोडली यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. इंद्रजित प्रधान व संदीप अष्टेकर यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली.
काहेरमध्ये योग दिन
काहेरच्यावतीने योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुऊवात बीएमके आयुर्वेद महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बीएमके आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रशिक्षकांनी योग प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर सामूहिक योगाभ्यासाद्वारे योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले. एनएसएस अधिकारी डॉ. संदीप सगरे यांनी योग दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल योग शिक्षक डॉ. अभय केस्ते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध योग स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी काहेरचे कुलगुरु प्रा. डॉ. संदीप श्रीवास्तव, कुलसचिव डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी यांच्यासह मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अश्विनी नरसन्नवर यांनी आभार मानले.
जायंट्स भवनमध्ये योग शिबिर
जागतिक योग दिनानिमित्त जायंट्स भवनमध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ज्येष्ठ योग शिक्षक श्रीकांत यांनी योगाचे महत्त्व, विविध योगप्रकार व नियमित योगाभ्यासाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण शिंदे होते. याप्रसंगी सुनील, अऊण काळे, अशोक हलगेकर, मोहन पत्तार, सुरेश पिसे, जयवंत पाटील यांच्यासह जायंट्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
पतंजली योगपीठाच्यावतीने योगोत्सवाचे आयोजन
जागतिक योग दिनानिमित्त राणी चन्नम्मानगर येथील सत्यप्रबोध मंगल कार्यालयात पतंजली योगपीठाच्यावतीने योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 17 वर्षांपासून अऊण पुणेकर व सुरेखा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगासने या नावाने मोफत योगवर्ग चालविले जात असून शेकडो साधकांनी योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चिदंबर मुनवळ्ळी व पतंजली योगपीठाचे राज्य प्रभारी किरण मंडूलकर उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व व त्याचे शारीरिक-मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ योग प्रशिक्षक आनंद आरळीकट्टी यांनी विविध योगासने सादर केली. शिल्पा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा पुणेकर यांनी योगवर्गाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सुरेश कल्याणशेट्टी, स्नेहा भाग्यवाडी, कोमल बबलाजीचे, संपदा गुरव, प्रधान यांनी परिश्रम घेतले.
इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे योग दिन
इंडियन डेंटल असोसिएशनच्यावतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. काकतीवेस येथील मॉडर्न जीममध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी विविध योग, सूर्यनमस्कार व प्राणायाम केले. डॉ. मेहताबली बंकापुरे व किरण कावळे यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. किर्तेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुशांत नाझरे, डॉ. नेत्रावती सबनीस, डॉ. राधाकृष्ण हरवडेकर, डॉ. जगदीश के., डॉ. अनुपम पाटील, डॉ. समीर पोटे, डॉ. सिद्धीभावी आदी उपस्थित होते.
जिल्हा न्यायालय आवारात योग दिन
जागतिक योग दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात रविवारी योग कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित योग शिबिरात संपूर्ण न्यायव्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना दिली. स्वत: योगासने करून सर्वांना प्रेरित केले. दैनंदिन मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शारिरीक आरोग्य जपण्यासाठी योग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. योग शिबिरात विविध न्यायालयांचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, वकील व इतरांनी प्राणायाम व विविध असनांचे प्रात्यक्षिक सादर करून योग दिन यशस्वी केला.
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये योग दिन
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावषीचा कार्यक्रम ‘निरोगी वृद्धापकाळासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित होता. या सामूहिक योग सत्रात जवान, त्यांचे कुटुंबीय, नागरी संरक्षण कर्मचारी व बॉईज स्पोर्ट्स कंपनीचे पॅडेट्स अशा सुमारे 850 जणांनी सहभाग घेतला होता. योग प्रशिक्षकांनी विविध योगासने व प्राणायामचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. या उपक्रमातून शारीरिक तंदुऊस्ती, मानसिक स्वास्थ्य व संतुलित जीवनशैलीचा संदेश देत योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याबाबत भारतीय लष्कराची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.