आरोग्य संपन्नतेसाठी योग महत्वाचा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
: जिल्हाधिकारी कार्यालयात योग दिन साजरा
► प्रतिनिधी
कोल्हापूर
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोज योगा करणे महत्वाचे आहे. योगामुळे आरोग्य संपन्न होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात योग दिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत प्रार्थना, प्राणायाम, ध्यान, शांतिपाठ, आसनाची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी योगाविषयी माहिती दिली.
शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी आभार मानले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, प्रांताधिकारी हरीश धार्मिक, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय माळी, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, तहसिलदार सैफन नदाफ, आशा होळकर, सुरेखा दिवटे, वनिता पवार, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, अरुण पाटील, मनीषा पाटील, रोहिणी मोकाशी, मार्गदर्शक प्रवीण कोंढवळे, रविभूषण कुमठेकरांसह अधिकारी, कर्मचारी, एस्तेर पॅटर्न हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.