महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुक्यात योग दिन उत्साहात साजरा

10:41 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर यांचा योगासनात सहभाग : अनेकांनी योगासनाचे महत्त्व सांगून सादर केली प्रात्यक्षिके 

Advertisement

खानापूर : तालुक्यात विविध ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालयांत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी 7 वाजता योगासने करण्यात आली. तसेच विविध उपक्रमही हाती घेण्यात आले. तालुका पंचायत आणि वनखात्याच्यावतीने तोपिनकट्टी येथील अमृतसरोवर परिसरात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, ग्रा. पं. अध्यक्षा रेखा सुतार, उपाध्यक्षा रेणुका कोळेकर, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर, वनखात्याचे शशिधर सत्तेगेरी, महांतेश जंगट्टी, रमेश चलवादी, विठ्ठल बनोशी, विष्णू तळवार तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

तोपिनकट्टी येथील सिद्धाश्रम मठ 

तोपिनकट्टी येथील सिद्धाश्रम मठातील सभागृहात सकाळी 7 वाजता योग दिन साजरा करण्यात आला. यानंतर योगासने करण्यात आली. यावेळी सिद्धाश्रम मठाच्या स्वामीजीनी योगासनाचे महत्त्व सांगितले. यावेळी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. शहरातील पतंजली योग शाखेच्यावतीने येथील मांगिरीश हॉलमध्ये योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुभाष देशपांडे, दत्तू सावळेकर, हेमांगी खासनिस, पार्वती गुरव यांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी शहरातील अनेक पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांत योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योग हा दिनचर्याचा भाग बनवावा, असे आवाहन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article