पर्वरी एलिव्हेटेड फ्लायओव्हरवर पुन्हा अपघात; भरधाव क्रेटा दुभाजकावर आदळली
10:05 AM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पर्वरी : नव्याने सुरू करण्यात आलेल्या पर्वरी एलिव्हेटेड फ्लायओव्हरवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. शुक्रवारी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव क्रेटा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन फ्लायओव्हरच्या मध्यभागातील दुभाजकावर जाऊन आदळले.
Advertisement
ही क्रेटा भाडेतत्त्वावरील असल्याची माहिती आहे. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या वेळी वेगाने वाहन चालवताना चालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Advertisement
Advertisement