येणेगुर येथील बेन्नीतुरा नदीवरील पुलावर भगदाड; नवरात्रोत्सवातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक भाविक खासगी वाहने, बस तसेच पायी प्रवास करून विविध देवी मंदिरांकडे जातात. अशा वेळी राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर भगदाड पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना भगदाडाचा अंदाज न आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन पुलावरील भगदाडाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत घटनास्थळी योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, धोक्याचा इशारा देणारे फलक लावावेत आणि आवश्यक असल्यास वाहतुकीचे नियमन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.