महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येडियुराप्पांना अटकेची भीती

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात अटक वॉरंट : उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव

Advertisement

बेंगळूर : पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध न्यायालयाने गुरुवारी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे येडियुराप्पांना अटकेची भीती सतावत आहे. दरम्यान, त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी मदत मागण्यासाठी गेलेल्या आपल्या अल्पवयीन मुलीशी येडियुराप्पांनी असभ्य वर्तन केले, असा आरोप एका महिलेने केला होता. महिलेने 3 मार्च 2024 रोजी अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी सदाशिवनगर पोलिसांत पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. नंतर सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले होते. याप्रकरणात सीआयडीला 15 जूनपर्यंत आरोपपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे सीआयडी पोलिसांनी बुधवार 12 जून रोजी येडियुराप्पा यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पण, येडियुराप्पा यांनी 17 जून रोजी चौकशीला हजर राहणार असल्याचे सीआयडीला पत्राद्वारे कळविले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची विनंती सीआयडीने केली. बेंगळूरच्या प्रथम जलदगती न्यायालयाने याची दखल घेत येडियुराप्पांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

Advertisement

अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात

अल्पवयीन मुलीचा छळ केल्याच्या आरोपावरून अटकेची भीती असल्यामुळे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांनी अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही राजकीय नेत्यांनी कट रचून कोणत्याही पुराव्यांशिवाय आपल्याविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामीचा प्रयत्न केला आहे. तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला हजर राहिल्यानंतर पुन्हा नोटीस बजावली असून केवळ एक दिवस वेळ देण्यात आला आहे. मात्र, आपण एका सभेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आहे. 12 जून ऐवजी 17 जून रोजी चौकशीला हजर राहण्याची ग्वाही दिली आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी हजर झाल्यानंतर कोणतेही म्हणणे न नोंदविता केवळ आवाजाचे नमूने घेतले होते. मात्र, चौकशीला गैरहजर राहिल्याचे सांगून दुसऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. आता मुदत न देता आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती येडियुराप्पांनी केली आहे.

आवश्यकता भासली तर अटक : डॉ. परमेश्वर

पॉक्सो प्रकरणाता आवश्यकता भासली तर सीआयडी पोलीस माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना अटक करतील. अटकेच्या कारवाईविषयी काहीही सांगता येणार नाही, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले आहे. या प्रकरणात सीआयडी पोलिसांना 15 जूनपूर्वी न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे येडियुराप्पांना नोटीस बजावली आहे. आवश्यकता भासली तर सीआयडीचे अधिकारी त्यांना अटक करतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article