महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वार्षिक राशिभविष्य 2024 : सिंह

06:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नेतृत्व गुणाची रास असल्याने प्रत्येक कामात या व्यक्ती अग्रेसर राहतात. भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व देतात. आपल्या सौंदर्याचा व प्रतिभेचा यांना गर्व असतो. मूलत: आळशी स्वभावामुळे कामाकडे दुर्लक्ष होते. पैसे खर्च करण्याच्या बाबतीत या व्यक्ती खूप कंजूस असतात. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे“ ही म्हण यांना तंतोतंत लागू पडते. बक्कळ पैसा असल्याने कुटुंबाचा पाठिंबा असतो.

Advertisement

राशीचा स्वामी सूर्य असल्याने या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतोच. प्रत्येक कामामध्ये या व्यक्ती पुढे असतात. ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत या व्यक्ती येतात. या व्यक्तींना आपल्या भावनांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे बऱ्याचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात. अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक चढउतार असतात. पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं. आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींना अभिमान असतो. त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच अंशी गर्विष्ठही असतात. आपली प्रशंसा ऐकायला खूपच आवडते. तसंच या व्यक्तींना स्वत:बद्दल फुशारकी मारायलाही जास्त आवडते. या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा खूपच उत्साही असतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे सर्व काही. या व्यक्तींना खूपच आत्मविश्वास असतो. लोकांचं ऐकलं तरीही स्वत:च्या मनाचेच निर्णय घ्यायचे, हे यांचे वैशिष्ट्या. करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास या व्यक्ती अतिशय प्रतिभावान असतात. तसंच पैसा कसा कमवायचा, याकडे यांचे जास्त लक्ष असते. या व्यक्ती चांगल्या उद्योगपती, इंजिनिअर, शिक्षक अथवा कलाकार होऊ शकतात. तर बोलण्याच्या बाबतीतही या व्यक्ती पुढे असतात. या व्यक्ती अतिशय आळशी असतात. एखादी गोष्ट कोणाहीसाठी केली तर ती केल्याबद्दल सतत या व्यक्ती ऐकवत राहतात. आळस जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामाकडेही दुर्लक्ष करतात. आपल्या मनाचे हे राजा असतात. एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट कशी टाळायची, याचे अनेक उपाय या व्यक्तींकडे असतात. आपल्या जवळच्या व्यक्तीने त्याच्या मनातील आपली जागा दुसऱ्याला देऊ नये याच गोष्टीची यांना भीती असते. नातं असो अथवा नोकरी, ज्यांच्याकडून प्रेम आणि प्रशंसा मिळेल अशाच व्यक्तींना या व्यक्ती आपलं मानतात. पैशाच्या बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात. यांना नेहमी कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. पण खर्च करताना या व्यक्ती खूपच कंजूष असतात.

Advertisement

ग्रहमान

गुरु  महाराज वर्षाच्या सुरवातीपासून मेच्या प्रथम तारखेपर्यंत नवम भावात राहून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात क्षमता प्रदान करेल. संतान संबंधित सुखाचा समाचार प्रदान करेल. तुमचे मन चांगल्या कामात लागेल. दान, धर्म आणि पुण्य करण्यातही तुमची रुची वाढेल. 1 मे ला देव गुरु बृहस्पती तुमच्या दशम भावात प्रवेश करतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचा समावेश होईल. उत्तरार्धात माता-पित्यासोबत तुमचे संबंध अनुकूल राहतील. ह्या वर्षात तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण सहयोग मिळेल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शनी कुंभ राशीला आहे, तुमच्या राशीला तो सप्तमस्थानात आहे. भागीदारी धंदा असेल तर त्यात अडचणी येऊ शकतात. पती-पत्नीमध्ये किंवा कौटुंबिक सौख्यामध्ये थोड्याबहुत अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र शनीचे भ्रमण आपल्यासाठी अशुभ नसणार. शनी पूर्ण वर्ष सप्तम भावात राहून तुमच्या दीर्घकालीन लाभाचे योग बनतील. तुमच्या व्यापाराचा विस्तार होईल परंतु त्याची गती धीमि असेल. शनी महाराज काहीही देतील, आरामात देतील, परंतु पक्के काम देतील. जसे-जसे वर्ष सरकत जाईल तशी तुमच्या व्यापारातही उन्नती होईल. तथापि, आठव्या भावात राहूची उपस्थिती झाल्याकारणाने तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. राहू आणि केतू यांचा विचार केला तर हे दोन्ही भ्रमण आपल्यासाठी तितकेसे चांगले नाही. राहूची उपस्थिती पूर्ण वर्ष तुमच्या आठव्या भावात राहण्याने स्वास्थ्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. या सोबतच, वाहन चालवताना सावधगिरी बाळगणेही आवश्यक असेल. अष्टम भावात राहूची उपस्थिती विभिन्न प्रकारच्या खर्चात तुम्हाला घेरेल. यामुळे वित्तीय संतुलन साधणे कठीण होईल. केतू तुमच्या दुसऱ्या भावात राहून कौटुंबिक समस्या निर्माण करेल. विवाहासाठी वर्षभर उत्तम गुरुबळ आहे.

नोकरदार

आपल्या करिअरमध्ये खूप चांगले बदल पहायला मिळतील. तुम्ही आपल्या कामाचे पक्के राहाल त्यामुळे वरिष्ठांची कृपा राहील. ते तुम्हाला समर्थन देतील आणि तुमचे कौतुकही होईल. वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला उत्तम यश मिळण्याचे योग येतील. तुमची मेहनत तुमच्यासाठी सर्व कार्य करेल आणि तुम्हाला पदोन्नतीही प्राप्त होऊ शकते. या सोबतच तुमची सॅलरीही वाढण्याचे संकेत मार्चपासून एप्रिलमध्ये दिसत आहेत. तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी करत असाल तर, तुमच्या मनात स्वत:चा व्यापार सुरु करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. काही नवीन व्यापारही सुरु करू शकता. तुम्हाला हाच सल्ला राहील की, नवीन व्यापार नोकरीसोबतच सुरु ठेवा आणि काही काळानंतर हळू हळू नोकरीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला विदेशी जाण्याच्या बऱ्याच संधी या वर्षी मिळतील. तुमच्या कामाच्या बाबतीत तुमची व्यस्तताही अधिक राहील. तुम्हाला आपल्या बजेटपैकी काही हिस्सा बचतीच्या रूपातही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही शेअर बाजाराच्या संबंधित काही काम करता किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करता तर, विचार करून गुंतवणूक केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही काही नवीन वाहन खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. घर आणि संपत्तीच्या गोष्टींना लक्षात घेतले तर, हे सांगितले जाऊ शकते की, या वर्षी तुम्ही काही मोठ्या संपत्तीचा विक्रय करू शकता. जर तुम्ही घर बनवण्याची इच्छा ठेवलात तर, मे नंतर तुम्हाला या कार्यात यश मिळू शकते. भाग्याच्या कृपेने तुमचा बँक बॅलेन्स वाढेल आणि धनसंचय करण्याची प्रवृत्तीही वाढेल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. जुलै महिना पळापळीचा राहील आणि कामात अतिव्यस्तता राहील. तुम्हाला या वेळात कामाच्या बाबतीत दुसऱ्या शहरात वा राज्यात जाण्याची संधी मिळेल.

स्त्री वर्ग

या वर्षी आपल्या करिअरमध्ये सुखद आणि आशाजनक परिणामांची प्राप्ती होईल. तुम्ही आपल्या नोकरीमध्ये आपले सर्वस्व लावून मेहनत कराल आणि मेहनत अजिबात व्यर्थ जाणार नाही, तुमचे काम चारही दिशेत प्रशंसा अर्जित करेल. तुम्ही आपल्या नोकरीवर खूप प्रामाणिक राहाल. मन लावून काम कराल. याचा फायदा हा होईल की, तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सान्निध्यात असाल. ते तुम्हाला मदत करतील. नोकरीच्या बाबतीत विदेशात जाण्याची संधीही प्राप्त करू शकता. तुम्हाला पदोन्नती देतील आणि सॅलरीमध्येही वृद्धी करतील. उदर संबंधित समस्या आणि नेत्र संबंधित काही समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येईल. दातदुखीही समस्येचे कारण बनू शकते. देव गुरु बृहस्पतीची कृपा तुम्हाला स्वास्थ्य समस्यांपासून बचाव करण्याचे काम करेल. तुम्हाला उत्तम वित्तीय फायद्याचे योग बनतील आणि वेळोवेळी मिळणारे वित्तीय लाभ, तुमच्या इच्छापूर्तीमध्ये सहाय्यक बनेल. यामुळे तुम्ही आपल्या नवीन योजनांना पुढे नेऊ शकाल आणि धन गुंतवणुकीच्या बाबतीतही विचार करू शकाल, कुटुंबासोबत वेळ घालवल्याने कुटुंबात नवीन ऊर्जेचा प्रवेश होईल आणि जुन्या समस्यांचे निवारण होईल. तुम्हाला कुणा दूरच्या नातेवाईकाच्या विवाहात सामिल होण्याची संधीही नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मिळू शकते. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तीर्थयात्रेवर जाऊ शकता. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीमध्ये जवळीकता वाढेल. तुम्ही कौटुंबिक गोष्टींमध्ये आवडीने भाग घ्याल आणि एकमेकांचे खरे जीवनसाथी बनतांना दिसाल. तुम्ही आपल्या व्यापारासाठी नवीन जागा खरेदी करत असाल तर त्यात पूर्ण चौकशी करून घ्या, म्हणजे काही कायद्याच्या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी 2024 हे खूप अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही पूर्णपणे सक्रिय असाल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. एप्रिलनंतर विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती वाढेल आणि तुम्ही मेहनत करत राहिल्यास तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. वकिली, इतिहास किंवा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि घरापासून दूर जाण्याचीही योजना असू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी उर्जेने आणि धैर्याने परिपूर्ण असतील. परिस्थिती बळकट होईल. परदेशी महाविद्यालयांमध्ये परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ थोडा प्रतिकूल असू शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article