For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होनगा येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा उत्साहात

10:26 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
होनगा येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा उत्साहात
Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

होनगा येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. देवीची ओटी भरण्यासाठी सुवासिनींनी दिवसभर गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. मंगळवारी विधिवत पूजा अर्चा झाली. सायंकाळी पाटील घराण्याच्या देवघरात साखरपुड्यांचे विढे काढले. हक्कदारी, देवस्थानी पंच व भाविक यांनी पाटील यांच्या देवघरातून सवाद्य मिरवणुकीने देवीचे मंदिरात आगमन झाले. भाविकांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरली. देवीला मनोभावे आरती करून नैवेद्य दाखविला. मंगळवारी पहाटे पुजारी यांच्या घरी लक्ष्मीदेवी स्थानापन्न झाली. कचेरी गल्लीतील मास्ती व मातंग मेस्त्री यांच्या घरी पूजाविधीचा धार्मिक कार्यक्रम झाला. तेथून सवाद्य मिरवणुकीने पुजारी बंधू यांच्या घरी बुधवारी सकाळी 10 वाजता देवीचे आगमन झाले. ढळगारे बंधू यांनी शस्त्र टोचण्याचा विधी केला. फकिरा पाटील यांनी गाऱ्हाणे घातले.

यात्रेला भाविकांची अलोट गर्दी

Advertisement

दुपारी 12 वाजता देवीच्या मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. हजारो भाविक सहभागी झाले होते. दुपारी एकच्या सुमारास ग्राम पंचायत समोरील गदगेवर देवी स्थानापन्न करण्यात आली. गाऱ्हाणे घालून मानाचा विधी पार पडला. बेन्नाळी पाटील बंधू घराण्याच्यावतीने खणा नारळाची ओटी भरण्यात आली. दिवसभर सुवासिनींनी देवीला ओटी भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दीतून वाट काढताना कसरत करावी लागत होती. रात्री उशिरा यात्रा समाप्तीचे गाऱ्हाणे घालण्यात आले. सायंकाळी 7 पासून रात्री  11.30 पर्यंत गल्लोगल्ली एकच गर्दी उसळली होती. गर्दीतून भाविक, पाहुण्यांना जाताना घरे शोधावी लागत होती. कुणाचा कुणाला थांगपत्ता लागत नसल्याचे जाणवत होते. अशा गर्दीतून भाविक श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेत होते. अनेक खाऊ व खेळणीच्या दुकानांतून गर्दी झाली होती.

Advertisement
Tags :

.