For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यात्रा-जत्रा तोंडावर,बकरी बाजाराला बहर

10:57 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
यात्रा जत्रा तोंडावर बकरी बाजाराला बहर
Advertisement

बेळगाव : यात्रा-जत्राना जोरदार प्रारंभ झाल्याने बकरी मंडईत बकऱ्यांचा बाजाराला बहर येवू लागला आहे. सांबरा, बिजगर्णी, कावळेवाडी, बेनकनहळ्ळी गावच्या महालक्ष्मी यात्रा तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे बकरी बाजार तेजीत येऊ लागला आहे. शनिवारी बकरी मंडईत विक्रीसाठी विक्रेते व ग्राहकांची संख्या वाढली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर बकरी बाजार भरल्याचे दिसून आले. बेळगाव तालुक्यातील यंदा पाच गावची महालक्ष्मी यात्रा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. त्यामध्ये सांबरा, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी आणि बेनकनहळ्ळी गावचा समावेश आहे. बकरी बाजारात लहान-सहान शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. पाच ते वीस हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांची विक्री सुरू होती. राकसकोप्प, बिजगर्णी, कावळेवाडी गावची श्री महालक्ष्मी यात्रा 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर बेनकनहळ्ळी गावच्या महालक्ष्मी यात्रेला दि. 23 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. विशेषत: यात्रा काळात मांसाहारी जेवणावळी होणार आहेत. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या खरेदीला वेग आला आहे. शनिवारी बकरी बाजारात शेळ्या-मेंढ्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली. शनिवारी बाजारात शेळ्या-मेंढ्या, पालवे विक्रीसाठी दाखल झाले होते. यरगट्टी, गोकाक आणि स्थानिक शेतकऱ्यांनी देखील विक्रीसाठी आणले होते. यात्रा, जत्रा, तोंडावर आल्याने शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री वाढली आहे. शेळ्या-मेंढ्यांचे दर स्थीर असले तरी यात्रांमुळे मागणी वाढू लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.