क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी यांचे निधन
11:43 AM Apr 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी: प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी येथील प्रसिद्ध लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक यासीन मुलाणी (60) रा. कारिवडे -साईलनगर यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले आणि त्याचवेळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली दहा वर्षे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. पश्चात पत्नी, मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement