यासीन मलिकच्या पत्नीची राहुल गांधींकडे मदतयाचना
07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पतीवरील आरोपांबाबत संसदेत चर्चेची मागणी
Advertisement
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दहशतवादी फंडिंग प्रकरणात तुऊंगात असलेले जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) प्रमुख यासीन मलिक यांची पत्नी मुशाल हुसैन मलिक हिने राहुल गांधींना पत्र लिहून मदत मागितली आहे. बुधवारी तिने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पतीवरील आरोपांबाबत संसदेत चर्चा सुरू करण्याची विनंती केली. मलिक जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात, असा दावाही तिने केला आहे. एनआयएने 2017 च्या टेरर फंडिंग प्रकरणात मलिकसह अनेक लोकांविऊद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने 2022 मध्ये त्याच्यावरील आरोपांवर दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Advertisement
Advertisement