महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा विकेट्सचा षटकार

06:05 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत वि इंग्लंड दुसरी कसोटी : दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाची कसोटीवर पकड : इंग्लंडला 253 धावांवर गुंडाळले : दुसऱ्या डावात भारताच्या बिनबाद 28 धावा, 171 धावांची भक्कम आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था /विशाखापट्टणम
Advertisement

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालचे द्विशतक (209 धावा) व जसप्रीत बुमराह (45 धावांत 6 बळी) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाने कसोटीवर पकड मिळवली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 396 धावांत आटोपल्यानंतर बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ 253 धावांत गारद झाला. यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस भारताने बिनबाद 28 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 13 तर यशस्वी जैस्वाल 15 धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता 171 धावांची भक्कम आघाडी असून आज तिसऱ्या दिवशी ही आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल.

दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस यशस्वीच्या द्विशतकाने आणि जसप्रीत बुमराहच्या 6 विकेट्सने गाजला. दिवसाच्या सुरुवातीला भारताने आपला पहिला डाव 6 बाद 334 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि आर. अश्विन यांनी डाव पुढे नेला. अश्विन 20 धावांवर पोहचला असताना अँडरसनने त्याची विकेट घेतली. दरम्यान, यशस्वीने आपले पहिले वहिले द्विशतक पूर्ण केले. जैस्वालने 290 चेंडूत 209 धावांची शानदार खेळी केली. त्याने 19 चौकार आणि 7 षटकार ठोकले. मात्र द्विशतक पूर्ण केल्यानंतर तो बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर रेहान आणि बशीरने भारताचा डाव संपवण्यास वेळ लावला नाही. रेहानने बुमराहला 6 धावांवर तर बशीरने मुकेशला शुन्यावर बाद करत भारताचा पहिला डाव 396 धावांवर संपवला. कुलदीप यादव 8 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.

बुमराहसमोर साहेबांचे सपशेल लोटांगण

भारताच्या 396 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. बेन डकेटने 21 धावा केल्या. यानंतर 114 धावांच्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला. जॅक क्रॉली अक्षर पटेलचा बळी ठरला. त्याने सर्वाधिक 11 चौकार व 2 षटकारासह 76 धावा केल्या. जॅक क्रॉली बाद झाल्यानंतर बुमराहने ऑली पोप, जो रुट व जॉनी बेअरस्टो यांना लागोपाठ तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीपने फोक्सचा 6 धावांवर त्रिफळा उडवला. पाठोपाठ रेहान अहमदला देखील 6 धावांवर बाद करत कुलदीपने आपली तिसरी शिकार केली. मात्र स्टोक्सने 47 धावा करत एक बाजू लावून धरली होती. तो तळातील फलंदाजांच्या साथीने भारताचे मनसुबे उधळणार असे वाटत असतानाच बुमराह पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला. बुमराहने 47 धावांवर त्याला बोल्ड करत भारताला आठवे यश मिळवून दिले. टॉम हार्टलीने 21 धावांचे योगदान दिले. अँडरसनला पायचीत करत बुमराहने इंग्लंडचा डाव संपवला. साहेबांना पहिल्या डावात 253 धावा करता आल्या व टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून बुमराहने 6, कुलदीपने 3 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.

भारताच्या बिनबाद 28 धावा

इंग्लंडला 253 धावांत गुंडळाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 5 षटकांत बिनबाद 28 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल 3 चौकारासह 15 तर रोहित शर्मा 3 चौकारासह 13 धावांवर खेळत होता. भारताकडे आता 171 धावांची आघाडी आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 396 व दुसरा डाव 5 षटकांत बिनबाद 28 (रेहित खेळत आहे 13, जैस्वाल खेळत आहे 15)

इंग्लंड पहिला डाव 55.5 षटकांत सर्वबाद 253 (जॅक क्रॉली 76, बेन डकेट 21, ऑली पोप 23, बेन स्टोक्स 47, टॉम हार्टली 21, बुमराह 45 धावांत 6 बळी, कुलदीप यादव 71 धावांत 3 बळी व अक्षर पटेल 1 बळी).

जैस्वालचे कारकिर्दीतील पहिले द्विशतक, दिग्गजांच्या क्लबमध्ये एंट्री

अवघ्या 22 वर्षीय टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील पहिल्या द्विशतकाची नोंद केली. सिक्स मारून शतक केलेल्या यशस्वीने चौकार लगावत द्विशतकाला गवसणी घातली. यशस्वीने अप्रतिम फलंदाजी करताना 290 चेंडूत 209 धावा फटकावल्या.  भारतीय सलामीवीर फलंदाजाने या सामन्यात 209 धावांची खेळी केल्यानंतर जेम्स अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टोच्या हातात झेलबाद केले. विकेट गमावून पवेलियनमध्ये जात असताना जयस्वालला इंग्लंडला चीअर करण्यासाठी आलेल्या चाहत्यांकडून ‘स्टँडिंग ओवेशन‘ मिळाले. कसोटीत द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या 21व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती.

कसोटीत द्विशतक करणारे युवा भारतीय

विनोद कांबळी - 224 धावा वि. इंग्लंड 1993 (21 वर्षे 35 दिवस)

विनोद कांबळी - 227 धावा वि. झिम्बाब्वे, 1993 (21 वर्षे 55 दिवस)

सुनील गावस्कर - 220 धावा वि. वेस्ट इंडिज 1971 (21 वर्षे 283 दिवस)

यशस्वी जैस्वाल - 209 वि. इंग्लंड 2024 (22 वर्षे 37 दिवस)

बुमराहचा भेदक मारा, ऑली पोप, स्टोक्स पाहतच राहिले

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. लंचनंतर बुमराहने जो रुट आणि ऑली पोप या दोन सर्वात महत्वाच्या विकेट घेतल्या. बुमराहने 28 व्या षटकात ऑली पोपचे स्टंप धारदार यॉर्करने उडवले. पोपने 54 चेंडूत 23 धावा केल्या होत्या. मागील सामन्याचा हिरो ठरलेल्या पोपला या सामन्यात मात्र बुमराहने चांगलाच दणका दिला. बुमरहाचा यॉर्कर एखाद्या मिसाइलप्रमाणे स्टंपवर येऊन आदळला. पोपला काही समजायच्या आतच त्याचे तिन्ही स्टंप उखडून पडलेले होते. पोपला बाद केल्यानंतर बुमराहने इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सलाही बोल्ड केले. बुमराहचा चेंडू स्टोक्स्ला समजला नाही. स्टम्प उखडताच स्टोक्स निराश झाल्याचे पहायला मिळाले.

कसोटीत बुमराहच्या 150 विकेट्स

जसप्रीत बुमराहने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात टॉम हार्टलीला 21 धावांवर बाद करत आपला पंजा पूर्ण केला. याचबरोबर त्याने आपल्या 150 विकेट्स देखील पूर्ण केल्या. कसोटीत सर्वात कमी डावात 150 बळी घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अश्विन पहिल्या स्थानी आहे.

कसोटीत सर्वात कमी डावात 150 बळी घेणारे गोलंदाज

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article