For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गेळे येथील यश दळवीचे आकस्मिक निधन

06:46 AM May 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
गेळे येथील यश दळवीचे आकस्मिक निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

सांगेली माध्यमिक विद्यालयात यावर्षी इयत्ता दहावीत गेलेल्या गेळे येथील यश विश्वनाथ दळवी (१५) या विद्यार्थ्याचे शुक्रवारी १५ रोजी सायंकाळी मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्याच्या निधनाने दळवी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असुन त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सांगेली आणि गेळे परिसरातही शोककळा पसरली. त्याच्या अकाली निधनाचा सर्वांनाच धक्का बसला.सांगेली माध्यमिक विद्यालयाच्या वसतिगृहात राहुन तो शिक्षण घेत होता. यावर्षी नववीतून तो इयत्ता दहावीत गेला होता. अभ्यासात आणि कला क्रीडा क्षेत्रात हुशार असलेला यश सांगेली आणि गेले परिसरात परिचित होता. विद्यार्थी दशेतही तो उत्कृष्ट क्रिकेट खेळायचा. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने अखेर शुक्रवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.शनिवारी सकाळी त्याचे पार्थिव मुंबईतून त्याच्या गेळे गावी आणण्यात आले. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, सांगेली माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे व इतर शिक्षकांसह गेळेवासियानी त्यांच्या घरी धाव घेत दळवी कुटुंबीयांचे सांत्वन केले. सकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात संस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजोबा, आजी, काका, काकी असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.