For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यश चौहान उत्तेजक चाचणीत दोषी

04:31 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
यश चौहान उत्तेजक चाचणीत दोषी
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्रीडा पथकातील कराटेपटू यश चौहान हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर तातडीने प्राथमिक स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या क्रीडा स्पर्धेत कराटे प्रकारातील कुराशमध्ये भारतातर्फे यशकुमार चौहानने आपला सहभाग दर्शविला होता. हा क्रीडा प्रकार 27 सप्टेंबरला घेण्यात आला. या क्रीडा प्रकारातील लढती चालू असताना अचानक स्पर्धा आयोजकांकडून कुराशपटुंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. यशकुमार चौहानच्या उत्तेजक चाचणीसाठी घेण्यात आलेल्या मुत्रल नमुन्यांमध्ये निर्बंध घातलेले अनेक द्रव सापडल्याचे सांगण्यात आले आहे. आशियाई ऑलिम्पिक मंडळातर्फे 24 वर्षीय यश चौहानवर प्राथमिक स्वरुपाची निर्बंध घालण्याची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात यशकुमारला पूर्ण माहिती देण्यात आली आहे. आता हे प्रकरण लॉसेनी येथील जागतिक क्रीडा लवादासमोर ठेवण्यात येणार असून उत्तेजक विरोधी संघटनेतर्फे यश चौहानला सुनावणीसाठी बोलावण्यात येईल. दरम्यान यश चौहानला आता कोणत्याही क्रीडा स्पर्धेत तसेच प्रशिक्षण सरावात सहभागी होता येणार नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.