कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रायगडच्या उत्खननात सापडले ‘यंत्रराज’!

12:07 PM Jun 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

दुर्गराज रायगडच्या उत्खननात सापडलेले प्राचीन ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र हे फक्त एक उपकरण नसून इतिहासाच्या अंधारात दडलेली विज्ञानाची मशाल पुन्हा एकदा उजळून टाकणारे ठरले आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या उत्खनन मोहिमेला मिळालेल्या या यशामुळे रायगडचे महत्त्व केवळ ऐतिहासिकच नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही अत्यंत उच्च दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

ज्याप्रमाणे एखादा कुशल शिल्पकार आपले शिल्प कोरण्याआधी दगडाच्या नसांची जाण घेतो, त्याचप्रमाणे रायगडच्या बांधणीसाठी खगोलशास्त्राचा अभ्यास करून दिशांचा, उंचीचा आणि भौगोलिक रचनेचा विचार झाला असावा, असा ठोस पुरावा म्हणून ‘सौम्ययंत्रा’ची ही झापड पाहता येईल. हे उपकरण प्राचीन काळी ग्रहताऱ्यांचा अभ्यास, अक्षांश-रेखांश निश्चित करणे, तसेच वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे. त्यामुळे रायगडसारख्या दुर्गम परंतु नियोजनबद्ध किल्ल्याच्या उभारणीमध्ये अशा वैज्ञानिक उपकरणाचा सहभाग असल्याची शक्यता खूप मोठी आहे.

या ‘सौम्ययंत्रा’चा शोध कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात, तसेच पर्जन्यमापक व वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात झालेल्या उत्खननात लागला. रायगडच्या रोपवेच्या अप्पर स्टेशनच्या मागील भागापासून कुशावर्त तलाव, बाजारपेठ, जगददिश्वर मंदिर अशा जवळपास 1012 ठिकाणी शिवकालीन वाड्यांचे अवशेष मिळाले आहेत. या वाड्यांच्या अवशेषातूनच हे यंत्र अत्यंत जपून, काळाच्या पडद्याआड लपलेले असताना आढळले.

या यंत्रराजाच्या वरील बाजूस ‘मुख’ आणि ‘पूंछ’ अशी अक्षरे कोरलेली असून, त्यामध्ये कासव किंवा सापासारख्या दोन प्राण्यांचे कोरीव अंकन आहे. या अक्षरांवरून उत्तर व दक्षिण दिशांचा अंदाज बांधणे शक्य होते, हे स्पष्ट होते. म्हणजेच यंत्रराज हे केवळ खगोलशास्त्राrय नाही, तर दिशादर्शक यंत्र म्हणूनही वापरले जात होते. हे उपकरण म्हणजे जणू त्या काळातल्या अभियांत्रिकीची आणि खगोलशास्त्राची सांगड घालणारा पूलच!

हे यंत्र म्हणजे एक अमूल्य सांस्कृतिक ठेवा असून, याच्या अभ्यासातून शिवकालीन अभियांत्रिकी, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र यांचा परस्पर संबंध उलगडण्यास मोठी मदत होणार आहे. अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी हे उपकरण म्हणजे जणू काळाच्या गर्भात साठवलेले ज्ञानाचे एक पवित्र ग्रंथच आहे.

रायगडच्या भूमीतून सापडलेले हे यंत्र म्हणजे जणू हजारो वर्षांपूर्वी विझलेली परंतु आज पुन्हा उजळलेली ज्ञानाची दीपमाळ आहे. ज्याप्रमाणे समुद्रात खोलवर गाडलेले खजिने एका थराखालून दुसरा उघड करत जातात, त्याचप्रमाणे रायगडाचे उत्खननही एका विज्ञानाधिष्ठित इतिहासाचे दरवाजे आपल्या समोर उघडत आहे.

या शोधामुळे फक्त रायगडच नव्हे, तर संपूर्ण मराठा इतिहासाच्या विज्ञाननिष्ठतेला नवी दिशा आणि अभ्यासाला नवा आयाम मिळाला आहे. येणाऱ्या काळात हे यंत्र सखोलपणे अभ्यासले जाईल आणि कदाचित शिवकालीन स्थापत्यशास्त्राच्या पायाभूत वैज्ञानिक संकल्पना अधिक स्पष्ट होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

                                                                                                                            - संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article