विजय वर्मासोबत झळकणार यामी
अभिनेत्री यामी गौतम आणि विजय वर्मा दोघेही स्वत:च्या अभिनयासाठी ओळखले जातात. यामीने अ थर्सडे, दसवीं आणि आर्टिकल 370 यासारख्या चित्रपटांमधून स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. तर विजयने गली बॉय, डार्लिंग्स आणि जाने जां चित्रपटाद्वारे स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता अत्यंत लवकरच दोघेही एकत्र दिसून येणार आहेत. यामी आणि विजय यांच्या चित्रपटाची निर्मिती विशाल राणा करणार आहे. तर दिग्दर्शन ध्वनिल पटेल करणार आहे. चित्रपटाची कहाणी आणि उर्वरित कलाकारांविषयी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. चित्रपटाची कहाणी यामी आणि विजय दोघांनाही पसंत पडली असून दोघांनीही होकार दर्शविला आहे. विजय आगामी काळात ‘गुस्ताख इश्क’ चित्रपटात दिसून येईल. तर यामी ही शाह बानो बेगम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यामी यापूर्वी ‘धूम धाम’ चित्रपटात दिसून आली होती. यामीचा पती आदित्य धर सध्या रणवीर सिंहसोबत मिळून ‘धुरंधर’ हा चित्रपट निर्माण करत आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.