‘कहानी’ फ्रेंचाइजीमध्ये यामी
06:20 AM Aug 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सुजॉय घोषचा चित्रपट ‘कहानी’मध्ये विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला आजही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट थ्रिलरपटांपैकी एक मानले जाते. 2012 मध्ये प्रदर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 2016 साली याचा सीक्वेल ‘कहानी 2’ प्रदर्शित झाला ,ज्याला बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडता आली नव्हती. आता कहानी 3 चित्रपट निर्माण करण्याची योजना पुढे सरकत असून यात यावेळी विद्या बालन मुख्य भूमिकेत नसणार आहे. या फ्रेंचाइजीमध्ये यामी गौतमची निवड करण्याचा विचार सुरू आहे.
Advertisement
कहानी 3 पूर्णपणे एक नवी कहाणी मांडणारा चित्रपट असेल. यामी गौतम यात मुख्य भूमिकेत असेल आणि तिची भूमिका अत्यंत दमदार असणार आहे. चित्रपट सध्या निर्मितीपूर्व टप्प्यात असून टीम शूटिंगच्या टाइमलाइनवर काम करत आहे. सुजॉय घोषच या कहानी 3 चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
Advertisement
Advertisement