For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नई नवेली’ चित्रपटात यामी गौतम

07:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नई नवेली’ चित्रपटात यामी गौतम
Advertisement

दसऱ्यावेळी होणार प्रदर्शित

Advertisement

अभिनेत्री यामी गौतमचा नवा चित्रपट ‘नई नवेली’ची घोषणा झाली आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असून तो दसऱ्याच्या सणावेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा बालाजी मोहन यांनी सांभाळली आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि कलर येल्लोने ‘नई नवेली’ चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने एक व्हिडिओ शेअर केला असून यात यामी ही लाल रंगाच्या साडीत नटून थटून दिसून येते, यानंतर हसत ती एकाच्या गळ्यात ओढणी अडकवून खेचत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

तर व्हिडिओच्या कॅप्शनदाखल ‘नई नवेली दुल्हन डायन’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या चित्रपटाला जी.व्ही. प्रकाश कुमार यांचे संगीत लाभले आहे. हा चिर्घ्पट प्रेक्षकांना असाधारण घटना घडणाऱ्या आणि कौटुंबिक उलथापालथीशी टक्कर देणाल्या जगात घेऊन जातो. चित्रपटाच्या कहाणीत अनेक रंजक अन् अनपेक्षित वळणं आहेत. चित्रपटात हॉररसोबत कॉमेडीचा डोसही मिळणार आहे. चित्रपटाची कहाणी मेरठच्या एका घरात आलेल्या सुनेवर आधारित आहे, जी चेटकिण असल्याचा संशय असतो. मेरठच्या एका अस्त-व्यस्त घरात एक आदर्श सून येते, या घराचे रुप ती पालटून टाकते, परंतु तेव्हा तिच्या दीराला ही सून प्रत्यक्षात एक चेटकीण असू शकते असा संशय वाटू लागतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.