For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नई नवेली’मध्ये यामी गौतम

06:05 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नई नवेली’मध्ये यामी गौतम
Advertisement

ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट

Advertisement

प्राइम व्हिडिओ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने चालू वर्षातील स्वत:च्या स्ट्रीमिंग डेट्स जाहीर केल्या आहेत. यानुसार अभिनेत्री यामी गौतमचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘नई नवेली’ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय करत असून बालाजी मोहन याचे दिग्दर्शन करणार आहे.

यामीचा हा चित्रपट भारतीय पौराणिक कथा आणि लोककथांचे एक मिश्रण असणार आहे. यात यामीला एका ‘क्रूर’ अवतारात दाखविले जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. त्यांनी यापूर्वी सितारे जमीन पर, लापता लेडीज आणि हीरामंडी द डायमंड बाजार या चित्रपटांसाठी काम केले आहे. तर नखरेवाली या चित्रपटानंतर आनंद यांच्यासोबत त्यांचा हा दुसरा चित्रपट असणार आहे.

Advertisement

नई नवेलीच्यी पटकथा ठरली असून सध्या याचे निर्मितीपूर्व काम सुरू आहे. नई नवेली हा चित्रपट प्रथम मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून त्यानंतर ओटीटीवर पाहता येणार आहे. यामी यापूर्वी इम्रान हाश्मीसोबत ‘हक’ या चित्रपटात दिसून आली होती.

यामीसाठी ‘नई नवेली’ चित्रपटातील भूमिका नव्या धाटणीची नसणार आहे. यापूर्वी तिने 2021 मध्ये प्रदर्शित भूत पुलिस या चित्रपटात काम केले होते. तर तिचा  अलिकडचा विनोदी चित्रपट धूम धाम होता, जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता, यात तिच्यासोबत प्रतीक गांधी हा मुख्य भूमिकेत होता.

Advertisement
Tags :

.