For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

यामाहाची वायझेडएफ-आर 3 व एमटी-03 दुचाकी डिसेंबरमध्ये होणार लाँच

06:29 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
यामाहाची वायझेडएफ आर 3 व एमटी 03 दुचाकी डिसेंबरमध्ये होणार लाँच

अंदाजे किंमत 3 लाख रुपये राहणार असल्याचे संकेत

Advertisement

नवी दिल्ली :

जपानची दुचाकी निर्मितीमधील कंपनी यामाहा ही वायझेडएफ आर3 आणि यामाहा एमटी 03 या दुचाकी 15 डिसेंबर 2023 रोजी सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे.

Advertisement

कंपनीने पहिल्यांदा मद्रास आंतरराष्ट्रीय सर्किट येथे या दोन्ही आगामी दुचाकींचे प्रदर्शन केले आहे. दोन महिन्यांच्या अगोदर ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे याचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

Advertisement

यामाहा आर 3 ही फेअर मोटारसायकल आहे, ज्याची रचना कंपनीच्या सुपर स्पोर्टस दुचाकी आर7 आणि आर1 सारखी आहे. दुसरीकडे एमटी 03 हे त्याचे वेगळे असे मॉडेल राहणार आहे. जे अधिक सरळ राइडिंग पोझिशन देत असल्याची माहिती आहे.

अंदाजे या दुचाकीची किंमत ही 3 लाख रुपये राहणार असल्याची शक्यता आहे. सादरीकरणानंतर ही गाडी भारतीय बाजारात अन्य काही मॉडेल्ससोबत स्पर्धा करणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :
×

.