यामाहाची हायब्रीड बाईक लाँच
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
यामाहा या दुचाकी क्षेत्रातील कंपनीने आपली पहिलीवहिली हायब्रीड बाईक एफ झेड एस एफआय ही भारतीय बाजारात लाँच केली आहे. 150 सीसी प्रकारातील या दुचाकीची किंमत 1 लाख 44 हजार 800 रुपये इतकी असणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तम मायलेज देणारे हायब्रीड इंजिन या गाडीला देण्यात आले आहे. स्मार्ट फोन कनेक्टिव्हिटी समवेत इतर अनेक वैशिष्ठ्यो या गाडीमध्ये दिली गेली आहेत. या गाडीत 4.2 इंचाचा फूल कलर टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर दिला असून वाय कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून स्मार्ट फोनची जोडणी करता येण्याची सोय गाडीत आहे. टर्न बाय टर्न नेव्हीगेशनची सुविधा गाडीत दिली असून आपल्याला रस्त्याचा अंदाज देण्यासोबत रस्त्यांच्या नावाचीही माहिती मिळते. हॉर्न स्विचची जागा या गाडीमध्ये बदलण्यात आली आहे. स्मार्ट मोटर जनरेटर आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टीमदेखील यात आहे.