For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यामाहा : चेन्नई कारखान्यात 50 लाखाव्या दुचाकीचे उत्पादन

06:51 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
यामाहा   चेन्नई कारखान्यात 50 लाखाव्या दुचाकीचे उत्पादन
Advertisement

50 लाखाव्या दुचाकीचे नाव ‘एरॉक्स 155 व्हर्जन एस’ : 30 टक्क्यांपेक्षा अधिक निर्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

इंडिया यामाहा मोटरच्या अत्याधुनिक चेन्नई कारखान्यात त्यांची 50 लाखावी दुचाकी तयार करण्यात आली आहे. यासह, कंपनीने तामिळनाडूमध्ये उत्पादनाची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या दशकात, चेन्नई प्रकल्प भारतीय ग्राहकांसाठी आणि निर्यात बाजारपेठेसाठी यामाहाच्या जागतिक ऑपरेशन्सचा अत्यंत महत्त्वाचा आधार बनला आहे. या प्रकल्पामधून बाहेर पडणारी 50 लाखावी दुचाकी ‘एरॉक्स 155 व्हर्जन एस’ आहे. कारखान्याच्या एकूण उत्पादनापैकी 30 टक्क्यांहून अधिक गाड्यांची विदेशात निर्यात केली जाते, जी त्याची उत्पादन क्षमता आणि जागतिक मागणी दर्शवते.

Advertisement

हा प्रकल्प सध्या यामाहाच्या हायब्रिड स्कूटर मॉडेल्सचे उत्पादन करतो. ज्यामध्ये रेझर 125 एफआय आणि फॅसिनो 125 एफआय, तसेच उच्च-कार्यक्षमता असलेली एरॉक्स 155 एस आवृत्ती समाविष्ट आहे. निर्यातीच्या दृष्टिकोनातून, हा प्रकल्प एफझेड मालिका, सॅलुटो मॉडेल आणि अल्फा स्कूटर्स देखील तयार करतो आणि विविध जागतिक बाजारपेठांमध्ये यामाहाच्या विश्वासार्ह गुणवत्तेच्या बाबतीत कारखान्याचे स्थान मजबूत करतो.

काय म्हणाले ओटानी

यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष इटारू ओटानी म्हणाले, यामाहाच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये चेन्नईतील प्लांटला धोरणात्मक महत्त्व आहे. या ठिकाणी होणारे उत्पादन हे उत्कृष्ठ तंत्रज्ञानाच्या साथीने केले जाते. जे जागतिक गुणवत्तेच्या बाबतीतले निकष पूर्ण करते. कुशल कर्मचाऱ्यांचे योगदान  आहेच पण नव्या मॉडेल्स सादर करण्यावरही कंपनीचा भर दिसतो.

प्लांटचे वैशिष्ट्या

सदरचा प्रकल्पाचा प्लांट हा 177 एकरच्या विस्तीर्ण प्लॉटवर असून येथे उत्तम, दर्जेदार वाहनांचे उत्पादन घेतले जाते, जे भारतात तर विकले जातेच पण विदेशातही वाहनांची निर्यात प्रामुख्याने चांगल्या टक्केवारीत केली जाते.

Advertisement
Tags :

.