For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

याकुबबोएव्हचा वैशालीशी हस्तांदोलनास नकार

06:49 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
याकुबबोएव्हचा वैशालीशी हस्तांदोलनास नकार
Advertisement

विज्य अॅन झी :

Advertisement

ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्हच्या भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीशी हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयामुळे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत वाद निर्माण झाला. उझबेक खेळाडूने नंतर त्याबद्दल माफी मागितली आणि त्यामागे धार्मिक कारण असून वैशालीचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. चेसबेस इंडियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वैशाली त्यांच्या चौथ्या फेरीच्या सामन्यापूर्वी हस्तांदोलन करण्याकरिता हात पुढे करताना दिसते. परंतु याकुबबोएव्ह प्रतिसाद न देता खाली बसतो. यामुळे भारतीय खेळाडू स्पष्टपणे अस्वस्थ झाल्याचे दिसून येते.

23 वर्षीय आणि 2019 मध्ये ग्रँडमास्टर बनलेला याकुबबोएव्ह हा सामना हरला आणि सध्या चॅलेंजर्स विभागात आठ फेऱ्यांनंतर त्याचे तीन गुण झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, याकुबबोएव्हने ‘एक्स’वर तपशीलवार प्रतिक्रिया पोस्ट केली. मला वैशालीसोबतच्या सामन्यातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण द्यायचे आहे. महिला खेळाडू आणि भारतीय बुद्धिबळपटूंचा आदर ठेवून मी सर्वांना कळवू इच्छितो की, धार्मिक कारणांपोटी मी इतर महिलांना स्पर्श करत नाही, असे त्याने त्यात म्हटले आहे.

Advertisement

भारतातील सर्वांत बलवान बुद्धिबळपटू म्हणून मी वैशाली आणि तिचा भाऊ यांचा आदर करतो. माझ्या वागण्याने तिचे मन दुखावलेले असेल, तर मी माफी मागतो, असेही त्याने म्हटले आहे. आपल्याला सामन्यापूर्वी वैशालीला यासंदर्भात माहिती देण्याची संधी मिळाली नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. याकुबबोएव्हचा पराभव केल्यानंतर वैशालीने पुन्हा हात पुढे केला नाही. तिचे सध्या आठ फेऱ्यांनंतर चार गुण झाले आहेत.

Advertisement
Tags :

.