महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

यक्षिक्त युवा फाउंडेशनचे तायक्वांदो साहस शिबिर उत्साहात

09:54 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक, तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांच्या यक्षिक्त युवा फाउंडेशन तर्फे आयोजित कणकुंबीच्या जंगलात अॅन द् एस्केपेड अॅट वूड्स  दोन दिवसीय साहस शिबिर उत्साहात पार पाडले. सदर शिबीर 5 ते 17 वयोगटातील मुलांसाठी  व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग, नाईट मार्च, टेंट पिचिंग, नाईट व्हिजिल आणि विशेष तायक्वांदो सराव सत्र सोबत इतर अनेक गिर्यारोहण क्रियाकलापांचा समावेश होत.  या उत्कंठावर्धक शिबिरात बेळगावच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे शिबिर भारतातील प्रसिद्ध साहसी तज्ञ संजय जवळकर व त्यांचे पुत्र ऋषिकेश जावळकर यांचे मार्गदर्शनात पार पडले. लिटिल स्कॉलर्स अकादमी येथील आरुष टूमरी व स्तुती टूमरी, बेन्सन्स यमनापूर येथील मोहम्मदशफी लतीफशाह चांदशाह व मोहम्मद लतीफशाह चांदशाह, श्री स्वामी विवेकानंद स्कूल कडोली येथील सान्वी  पाटील,  सेंट जॉन्स काकती येथील आयुष चंद्रशेखर साळूखें,  संजय घोडावत स्कूलच्या सोयरा घाडी, दीप पाटील, सानवी वासोजी, तन्वी इनुकुर्ती,  अन्वी बागी आणि लिंगराज पदवी पूर्व कॉलेजातून त्रिवेणी बडकन्नावरने हा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. शिबिरार्थीना भारतातील सुप्रसिद्ध एडवेंचरिस्ट आणि पर्वतारोहक ऋषिकेश जवळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article