For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप नेत्या माधवी लतांना वाय प्लस सुरक्षा

06:29 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप नेत्या माधवी लतांना वाय प्लस सुरक्षा
Advertisement

तेलंगणात मिळणार सुरक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

केंद्र सरकारने हैदराबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांना सीआरपीएफची वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. माधवी लता यांना केवळ तेलंगणासाठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ल्यात यश मिळविण्यासाठी भाजपने फायरब्रँड नेत्या माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने सनातनच्या रक्षणाची सोपविलेली जबाबदारी पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माधवी लता या राजकारणात नवख्या असल्या तरीही हैदराबादमध्ये त्या ओवैसी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

माधवी यांनी तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच त्या जुन्या हैदराबादमध्ये गरीब मुस्लीम परिवारांना शिक्षण मिळवून देण्याचे कार्य करतात. तसेच मुस्लीम परिवारांमधील मुलींच्या कल्याणासाठी त्या कार्यरत आहेत.

Advertisement
Tags :

.