शाओमीचा 17 अल्ट्रा फ्लॅगशिप बाजारात दाखल
200 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह अत्याधुनिक फिचर्स सुविधा : किंमत 1,39,999 रुपये
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी शाओमीने भारतीय बाजारात आपला सर्वात शक्तिशाली फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘शाओमी 17 अल्ट्रा’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यावर कंपनीचा दावा आहे की, हा जगातील पहिला फोन आहे ज्यामध्ये लायकाचा 1-इंच एलओएफआयसी सेन्सर आहे. फोटोग्राफी उत्साही लोकांसाठी, यात 200-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला असून व्यावसायिक फोटोग्राफी किट सारखी वैशिष्ट्यो यात दिली आहेत.
16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज
भारतात, ‘शाओमी 17 अल्ट्रा’ एकाच स्टोरेज प्रकारात लाँच करण्यात आला आहे. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज आहे, ज्याची किंमत 1,39,999 आहे. हा फोन 18 मार्चपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल. 13 ते 17 मार्च दरम्यान फोन प्री-बुकिंग केल्यास 19,999 रुपयांचा ‘शाओमी प्रोफेशनल फोटोग्राफी किट प्रो’ मोफत मिळेल.
डिझाइन आणि बिल्ड: प्रीमियम लेदर फिनिश आणि ग्लास प्रोटेक्शन
‘शाओमी 17 अल्ट्रा’ अल्ट्राचे डिझाइन खूपच प्रीमियम आणि एर्गोनॉमिक आहे. फोनच्या मागील पॅनलवर एक मोठा वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे जो त्याला प्रोफेशनल कॅमेरा लूक देतो. फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये देण्यात आला आहे. समोरील संरक्षणासाठी ‘शाओमी शील्ड ग्लास 3.0’ वापरण्यात आला आहे. फोनचे वजन सुमारे 219 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 8.29 मिमी आहे. हातात तो खूपच मजबूत आणि प्रीमियम वाटतो.
टेलिफोटो कॅमेरा : 200-मेगापिक्सेल सॅमसंग एचपीइ सेन्सर, 120 एक्स डिजिटल झूम करण्यास सक्षम.
अल्ट्रावाइड : 50 मेगापिक्सेल कॅमेरा (115-डिग्री फील्ड ऑफ ह्यू).
सेल्फी : व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी समोर 50-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी : हे वाय-फाय 7, ब्लूटूथ 6, एनएफसी आणि 5जीच्या सर्व प्रमुख बँडना सपोर्ट करते.
बॅटरी आणि चार्जिंग : 90 की फास्ट चार्जिंगशाओमीने या फ्लॅगशिप फोनमध्ये 6,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे.