For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाओमीमुळे चीनच्या शेअर बाजारात घसरण

06:10 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
शाओमीमुळे चीनच्या शेअर बाजारात घसरण
Advertisement

हँगसेंग निर्देशांक 3 टक्के घसरणीत

Advertisement

बीजिंग :

चीनमधील तंत्रज्ञान कंपन्यांवरती बाजारात मंगळवारी दबाव पाहायला मिळाला. त्यांच्या बाजारातील हँगसेंग निर्देशांक जवळपास 3.8 टक्के इतका घसरलेला दिसून आला. महिन्यामध्ये पाहता सर्वाधिक घसरण या निर्देशांकाने मंगळवारी अनुभवली होती. चीनच्या बाजारात मंगळवारी एकदम घसरण दिसली आहे. 18 मार्चला सर्वोच्च पातळी गाठलेला निर्देशांक सध्याला पाहता नऊ टक्के इतकी घसरण अनुभवत आहे.

Advertisement

कोण ठरलं कारण

या घसरणीचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाओमी कंपनी ठरली आहे. शाओमीचे समभाग बाजारामध्ये जवळपास 6 टक्के इतके घसरणीत दिसून आले. शाओमी कॉर्पने जवळपास 5.5 अब्ज डॉलर्सचे समभाग विक्री केल्याने बाजारामध्ये गुंतवणूकदारांपुढे चिंता दिसून आली. या दबावाचा परिणाम हँगसेंगवर दिसला.

एआय कंपन्याही दबावात

याचदरम्यान चिनी टेक कंपन्यांचे ताजे निकाल हे अंदाजानुसारच लागले आहेत. नफ्यात आश्चर्यकारक अशी वाढ दिसलेली नाही. दुसरीकडे अलीबाबाचे चेअरमन जो त्सई यांनी डाटा केंद्रांच्या निर्मिती संदर्भामध्ये शंका व्यक्त केल्याने एआय क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे समभाग दबावात आलेले दिसून आले. सनी ऑप्टीकल टेक्नॉलॉजीचे समभाग 9 टक्के इतके घसरले होते.

Advertisement
Tags :

.