For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेवियर्स, सर्वोदय, भरतेश, संतमीरा, हेरवाडकर विजयी

09:47 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
झेवियर्स  सर्वोदय  भरतेश  संतमीरा  हेरवाडकर विजयी
Advertisement

56 वी फादर एडी फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाइडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून सेंट झेवियर्स, सर्वोदय खानापूर, भरतेश, संतमीरा, एम. व्ही. हेरवाडकर संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला आहे. सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या फादर एडी स्पर्धेच्या सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भरतेश संघाने मराठी विद्यानिकेतनचा टायब्रेकरमध्ये 7-6 अशा गोलफरकाने पराभव केला.

सामन्याच्या आठव्या मिनीटाला विद्यानिकतेच्या प्रेम पाटीलने पहिला गोल केला. 15 व 22 व्या मिनीटाला भरतेशच्या स्वयंम मलिकने सलग दोन गोल करुन 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 28 व्या मिनीटाला गौतम हुंदरेने विद्यानिकतेनला दुसरा गोल करुन दिला तर 34 व्या मिनीटाला गौतम पावशेने गोल करुन 3-2 अशी आघाडी मिळविली. 49 व्या मिनीटाला भरतेशच्या शुभम आर. ने गोल करुन बरोबरी साधली. निर्धारित वेळेत दोन्ही संघाचे गोलफलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये भरतेशने विजय संपादन केले. भरतेशतर्फे स्वयंम मलिक, शुभम लोहार, कुलदीप सिंग, तरुण यांनी गोल केले. तर विद्यानिकतेनतर्फे गौतम पावशे, पवन पाटील, नवनाथ मोदेकर यांनी गोल केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात संतमीरा संघाने कनक मेमोरीयलचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या मिनीटाला संतमीराच्या अब्दुल मुल्लाने पहिला गोल केला तर खेळ संपण्यास काही सेकंद असताना फैजान धामणेकरने गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्सने जी. जी. चिटणीसचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. चौथ्या मिनीटाला झेवियर्सच्या अर्जुनने पहिला गोल केला तर पाचव्या मिनीटाल गोल करुन 2-0 ची आघाडी मिळविली. सातव्या मिनीटाला चिटणीसच्या केदारलिंग संभाजीचे गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. 19 व्या मिनीटाला झेवियर्सच्या माहीदने तिसरा गोल केला.

22 व्यामिनीटाला चिटणीसच्या युसुब मोकाशीने तर झेवियर्सच्या रुझवानने गोल करुन 4-2 अशी आघाडी मिळविली. चौथा सामन्यात सर्वोदय खानापूरने सेंट मेरीजचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व 62 व्या मिनीटाला आनंद राऊतने सलग दोन गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सेंट मेरीजला गोल करण्यात अपयश आले. पाचव्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने ज्ञान प्रबोधन मंदिरचा 3-0 असा पराभव केला. 28 व्या मिनीटाला हेरवाडकरच्या वेदांत पाटीलने पहिला गोल केला तर 40 व 55 मिनीटाला शुभम कोरेने दोन गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली.

Advertisement
Tags :

.