For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

59 वर्षांपर्यंत इतरांसाठी लिहिली 1 लाख पत्रं

06:30 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
59 वर्षांपर्यंत इतरांसाठी लिहिली 1 लाख पत्रं
Advertisement

इंटरनेट, मोबाइल फोन, व्हिडिओ कॉलिंग आणि मेसेजिंग अॅपच्या काळात हाताने पत्र लिहून पाठविणे एखाद्या जुन्या काळातील गोष्ट वाटू लागते. पंतु एकेकाळी जेव्हा संचाराची इतकी साधनं नव्हती, तेव्हा दूर ठिकाणी राहणाऱ्या स्वकीयांशी जोडण्याचे सर्वात मोठे माध्यम पत्रच होते. पूर्वीच्या काळात इतरांसाठी पत्र लिहिणे एक पेशा होता. काही लोकांनी पिढ्यानपिढ्या पत्र लिहिण्याच्या कामालाच स्वत:चे करियर केले होते. चीनमध्ये देखील अशीच परंपरा होती.

Advertisement

आता पत्र लिहिणे आणि पाठविणे जणू हरवून गेले आहे, परंतु लेटर रायटिंगचा जमाना देखील यापूर्वी राहिला अहे. अशास्थितीत चीनमधील एक इसम सध्या चर्चेत आहे. त्याला तेथील अंतिम प्रोफेशनल लेटर रायटर म्हटले जातेय. त्या इसमाने मागील 59 वर्षांमध्ये इतरांसाठी जवळपास 1 लाखाहून अधिक पत्रं लिहिली आहेत.

दक्षिणपूर्व चीनमध्ये राहणाऱ्या 77 वर्षीय इसमाने जवळपास 6 दशकांपर्यंत लोकांच्या स्वत:च्या घराच्या आठवणी, अडचणी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांना शब्दांमध्ये व्यक्त करत समुद्रापार पाठविण्यात येणाऱ्या पत्रांमध्ये रुपांतरित केले आहे.

Advertisement

फुजियान प्रांताच्या क्वानझोउ येथे राहणारे जियांग मिंगडियन यांना चीनच्या अंतिम सक्रीय प्रोफेशनल पत्रलेखकांपैकी एक मानले जाते, परंतु आता किती लोक या पेशाला स्वीकारतील हाच खरा प्रश्न आहे. 59 वर्षांपेक्षा अधिक काळात जियांग यांनी स्थानिक परिवारांच्या वतीने विदेशांमध्ये राहत असलेल्या नातेवाईकांना 1 लाखाहून अधिक पत्रं लिहिली आहेत. ही पत्रं फिलिपाईन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया समवेत अनेक देशांपर्यंत पोहोचली आहेत.

स्वत:च्या आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे जियांग यांनी वयाच्या 18 व्या वर्षी या पेशामध्ये पाऊल ठेवले होते. त्यांचे वडिल चीनच्या प्रारंभिक प्रोफेशनल पत्रलेखकांपेकी एक होते, तर आई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. आईनेच त्यांना प्रारंभिक शिक्षण दिले होते. इतरांसाठी पत्र लिहिण्याचा हा पेशा फुजियानच्या दीर्घकाळापासून होत चालत असलेल्या स्थलांतरामुळे अस्तित्वात आला होता. 1840 च्या दशकापासून युद्ध आणि गरिबीमुळे हतबल होत मोठ्या संख्येत युवा कामाच्या शोधात प्रांत सोडून गेले. ते घरी पत्रं अन् पैसे पाठवत होते. परंतु निरक्षरतेमुळे अनेक नातेवाईक ही पत्रं वाचू शकत नव्हते किंवा पत्राला उत्तर देऊ शकत नव्हते. याच दरीला दूर करण्यासाठी प्रोफेशनल लेटर रायटर समोर आले.

गावोगावी सायकलने प्रवास

जियांग यांच्या कामात अनेकदा स्थानिक बोलीभाषांना लिखित चिनी भाषेत मजकूर बदलण्याचा प्रकार सामीय असायचा. तर पत्त्यांचा सर्वसाधारणपणे विदेशी भाषांमध्ये काळजीपूर्वक आणि अचूक अनुवाद करावा लागत होता. जियांग यांनी प्राथमिक शाळेपासूनच भाषा शिकण्यास सुरुवात केली होती, टेप आणि डिक्शनरीचा वापर करून इंग्रजी, जर्मनी, स्पॅनिश आणि व्हिएतनामी समवेत अन्य भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या.

स्वत:च्या प्रारंभी वर्षांमध्ये जियांग सायकलने एका गावातून दुसऱ्या गावी जायचे. स्थलांतरित चिनी लोकांच्या परिवारांसाठी पत्र वाचायचे आणि त्याचे उत्तर लिहायचे. नंतर त्यांनी शहरात रस्त्याच्या कडेला एक छोटासा स्टॉल उभारला. अशास्थितीत जेव्हा नियमित नोकऱ्यांमध्ये सामील जियांग यांचे मित्र दर महिन्याला 12 युआन कमवयाचे. तर जियांग इतरांसाठी पत्र लिहून प्रतिदिन दोन युआन कमावत होते. हे उत्पन्न त्यांना स्वत:च्या तीन पुत्रांचे पालनपोषण करण्यास मदत करत होते.

जियांग यांच्यासाठी एका पत्राचा अनुवाद पुरेसा नव्हता, यात भावना, परिस्थिती आणि वातावरणाला त्यानुसार सांगणे आवश्यक होते. विदेशात जाणाऱ्या अनेक चिनी स्थलांतरितांना अत्याधिक अडचणींना तोंड द्यावे लागते. नातेवाईक अधिक वित्तीय सहाय्य मागायचे, तेव्हा जियांग त्यांच्या समस्यांची तीव्रता कमी करायचे आणि आजार किंवा अन्य कौटुंबिक अडचणींचा दाखला देत हुशारीने पत्रांमध्ये विनंती करायचे.

मनस्पर्शी काही पत्रांच्या कहाण्या

ज्या कहाण्यांनी त्यांना सर्वाधिक प्रभावित केले, त्यातील एका अशा पत्नींची कहाणी होती, ज्यांना स्थानिक रुपात फांकेश शेन नावाने ओळखले जायचे. त्यांचाप ती दक्षिणपूर्व आशियात गेला हेता, तर त्या परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मागे राहिल्या होत्या. एका महिलेने वयाच्या 14 व्या वर्षी विवाह केला, 15 व्या वर्षी अपत्याला जन्म दिला आणि स्वत:च्या पतीचा विदेशात मृत्यू झाल्यावर 96 वर्षांपर्यंत विधवा राहिलेल्या महिलेचे उदाहरण जियांग यांनी दिली. तर अन्य एक महिला अनेक वर्षांच्या एकाकीपणामुळे थकून गेली होती, अनेकदा स्वत:च्या अनुपस्थित पतीविषयी तक्रार करायची, परंतु जियांग यांनी तिच्या तक्रारींना कवितांचे स्वरुप देत समुद्रपार पाठविले होते. या  फांके शेनसाठी पूर्ण जीव काही अक्षरांमध्येच संपत होते. 20 व्या शतकांपर्यंत जियांग अशा महिलांना विदेशात स्वत:च्या पतींसोबत पुन्हा भेटण्यासाठी प्रोत्साहित करायचा. मोबाइल आणि सोशल मीडिया आल्यामुळे संचाराच्या पद्धतीत बदल घडले, अन जियांग यांच्या ग्राहकांची संख्या सातत्याने घटत गेली. अनेक वृद्ध नियमित ग्राहक आता हयात नाहीत.

Advertisement
Tags :

.