For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेखक, अनुवादक बलवंत जेऊरकर यांचे निधन

10:58 AM Jun 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
लेखक  अनुवादक बलवंत जेऊरकर यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे व्यासंगी आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातील हिंदी विभागातील प्रा. बळवंत जेऊरकर यांचे पहाटे हृदयविकाराने निधन झाले. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. कायम लेखनमग्न असणाऱ्या जेऊरकरांचे निधन क्लेशदायी आहे. मराठी आणि हिंदीतील अनेक उत्तम ग्रंथांचा त्यांनी अनुवाद केला होता. गेल्यावर्षी आपल्याकडे सावंतवाडीत कोजागरी साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. माझा एक खूप जवळचा मित्र गेल्याचे दुःख आहे. अतिशय उत्तम अनुवादक, व्यासंगी, हिंदी गझल व गीतांचा अभ्यासक व संवेदनशील माणूस निघून गेला. त्याच्या जाण्याने निश्चितच आपली हानी झाली आहे, अशा शब्दात साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.