मजगावात आज कुस्ती मैदान
बेळगाव : मजगाव येथे ब्रह्मदेव कुस्ती संघटना मजगाव आयोजित हनुमान जयंतीनिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन आज बुधवार दि.16 रोजी ब्रह्मदेव कुस्ती आखाडा तलाव येथे करण्यात आले आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शिवा पुणे विरूद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता सोहेल इराण यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती अमितकुमार विरूद्ध उपमहाराष्ट्र केसरी बाळू बोडके, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरूद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता मिलाद इराण, चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शुभम कोळेकर गंगावेश विरूद्ध महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले इचलकरंजी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी दर्गा व करण हरियाणा यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबर महिला कुस्तीला प्राधान्य देण्याकरिता महिलांच्या लढती आयोजीत केल्या आहे. पहिल्या नंबरची कुस्ती राधिका विरूद्ध ऋतुजा रावळ, दुसऱ्या क्रमांकाची तनुजा खानापूर विरूद्ध अक्षरा येळ्ळूर, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शीतल सुतार व आदिती कोरे, चौथ्या क्रमांकाची मनस्वी मजगाव व समिक्षा खानापूर, पाचव्य क्रमांकाची रिया संतीबस्तवाड व अंजली शिंदे शहापूर यांच्यात होणार आहे. त्याचप्रमाणे अन्य काही महिला लढती होणार आहेत.