कणबर्गीत आज कुस्ती मैदान
बेळगाव : कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना आणि एसएस फोंडेशन यांच्या वतीने सोमवार दि. 14 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन बस स्टॉप समोर करण्यात आले आहे. सदर मैदान जय हनुमान कुस्ती मैदानात, प्रथम क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश केसरी अमित कुमार दिल्ली वि. डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे याच्यात, दुसऱ्या क्रंमाकाची कुस्ती उपकर्नाटक केसरी शिवा दड्डी वि.महाराष्ट्र चॉम्पियन सुमित पाटील, तिसऱ्या क्रंमाकाची कुस्ती कर्नाटक चॉम्पियन कामेश कंग्राळी वि. विशाल शिळके सांगली,
चौथ्या क्रंमाकाची कुस्ती राष्ट्रीय चॉम्पियन प्रेम कंग्राळी वि. अनुष दिल्ली, पाचव्या क्रंमाकाची कुस्ती विक्रम शिनोळी वि. अदित्य पाटील सांगली, सहाव्या क्रंमाकाची कुस्ती संजु इंगळगी वि. प्रथमेश हट्टीकर, सातव्या क्रंमाकाची कुस्ती ओमकार शिंदे राशिवडे वि. निखिल कंग्राळी, आठव्या क्रंमाकाची कुस्ती आप्पासाहेब इंगळगी वि. राज पवार सांगली, नव्या क्रंमाकाची कुस्ती कार्तिक इंगळगी वि. पृथ्वीराज पाटील, दहाव्या क्रंमाकाची कुस्ती हणमंत गदीगवड वि. विनायक यांच्यात होणार आहेत. तर याशिवाय 50 हुन अधिककुस्त्यांचे आयोजीत करण्यात आले आहे.