बेळगावच्या कुस्तीपटूंचे घवघवीत यश संपादन
बेळगाव : बेंगळूरमध्ये झालेल्या 15 वर्षांखालील वयोगटाच्या कर्नाटक राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत बेळगाव डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या महिला व पुऊष मल्लांनी विविध वजनी गटात 6 सुवर्णपदकासह 14 पदकांची कमाई केली. सदर स्पर्धेत प्रांजल बिर्जे 33 किलो गटात सुवर्ण, संध्या शिरहट्टी 42 किलो गटात सुवर्ण, चैतन्या 46 किलो गटात सुवर्ण, सानिका हिरोजी 54 किलो गटात सुवर्ण, नंदिनी 57 किलो गटात सुवर्ण, आराध्या हलगेकर 46 किलो गटात रौप्य, श्रावणी तरळे 66 किलो गटात रौप्य, नूतन पाटील 36 किलो गटात कांस्य, श्रुती मदार 39 किलो गटात कांस्य, अदिती कोरे 50 किलो गटात कांस्यपदक मिळविले. मुलांच्या गटात श्रीशैल कर्णी 68 किलो गटात फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक, संदीप शिरहट्टी 52 किलो वजनी गटात कांस्यपदक, कैलाश ए. टी. 68 किलो गटात ग्रीको रोमन प्रकारात कांस्यपदक, प्रथमेश आवळे 44 किलो वजनी गटात कांस्यपदक घेतले. या मल्लांना बी. श्रीनिवास, कुस्ती प्रशिक्षका स्मिता पाटील, मंजुनाथ मादार, हनुमंत पाटील आणि नागराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.