कंग्राळी खुर्दमध्ये मल्लांचा सन्मान
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावचे मल्ल कामेश पाटील, प्रेम जाधव,भक्ती पाटील या तिघांनी म्हैसूर येथे नुकत्याच झालेल्या दसरा क्रीडा स्पर्धेत विविध वजनी गटामध्ये पदके मिळवून कंग्राळी खुर्द गावाबरोबर बेळगाव जिल्ह्याचे नाव सर्वत्र उंचविले आहे. मल्ल कामेश पाटीलने खुल्या गटातील दसरा कंठीरवा पुरस्कार मिळविला. प्रेम जाधवनेही खुल्या गटात सलग दुसऱ्यावर्षी दसरा केसरी बरोबर सुवर्ण पदक मिळविले. तर महिला विभागात भक्ती पाटीलने 54 किलो वजनी गटात मुख्यमंत्री केसरी पुरस्कार मिळविला आहे.
विजेत्या मल्लांचे कंग्राळी खुर्द येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी भजनी मंडळ, ग्रामस्थ तसेच श्री विठ्ठल-रूक्मीणी मंदीरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. शटूप्पा पाटीलसह इतर सदस्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरविले. मंडळाचे खजिनदार महादेव पाटील, सेक्रेटरी आनंद आंबेवाडीकर, एस. आर. पाटील, अमोल चव्हाण, किसन पावशे, एम. वाय. पाटील, प्रकाश बाळेकुंद्रीसह व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.