ओमकारने प्रेमकुमारला दाखवले अस्मान
तुडये कुस्ती मैदान : शंभर लहान-मोठ्या कुस्त्या निकाली
वार्ताहर/तुडये
येथील आराध्य दैवत श्री रामलिंग माही यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्याच्या उद्घाटन समारंभाला विलास सुतार होते,या मैदानात शाहू आखाडा कोल्हापूरचा मल्ल ओमकार जाधवने प्रतिस्पर्धी मल्ल प्रेमकुमार, कंग्राळी याचा थेप मारणी डावावर अवघ्या दोन मिनिटात अस्मान दाखवत तुडयेचे मैदान जिकले, या स्पर्धेच्या उद्घाटनला अशोक पाटील, शांताराम पाटील, के. एस. पाटील, मारुती पाटील,होते तर यांच्या हस्ते,फोटो पूजन,करण्यात आले, आखाडा पूजन पुंडलिक हुलजी व गोपाळ पाटील यांनी केले, यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, हणमंत पाटील, गणपती कोरजकर, सतीश पाटील, वैजनाथ उसणकर, सागर नरगुंदकर, सोमनाथ मोहिते, रघुनाथ पाटील, हर्षवर्धन कोळसेकर, अरुण पाटील, गोविंदास गीरी, उपस्थित होते, यावेळी के. जी. पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रमांकाच्या लढतीत प्रेमकुमारने सुरुवातीला ओमकार याच्यावर चढाई केली, मात्र ओमकारने सावध लढत प्रत्येक वेळी त्याची चढाई परतून लावली दुसऱ्या मिनिटाला चढाई करणाऱ्या प्रेमकुमारला चकमा देत जोराची चाल करत थेप मारणे डावावर प्रेमकुमार याचा पराभव केला दुसऱ्या क्रमांकच्या लढतीत पार्थ कंग्राळीने डंकी डावावर आशुतोष लाडचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पवन चिकदिनकोपने पृथ्वीराज कंग्राळी याच्यावर मात केली. संकेत कोल्हापूर व निखिल कंग्राळी यांच्यातील चौथ्या क्रमांकाची लढत बरोबरीत सोडवण्यात आली,या वितरीक मैदानात 125 लहान मोठया कुस्त्याच्या जोड लावण्यात आले.तर मैदानात लहान मुलांच्या कुस्त्या आकर्षक ठरल्या,या वेळी कृष्णा गुरव, विष्णू गुरव, मारुती मयेकर, सातेरी पाटील, कृष्णा पाटील प्रशांत पाटील,परशराम गुरव,जोतिबा चांदीलकर, यांनी पंचांचे काम पहिले, प्रा. व्ही.व्ही.कोलकार यांनी समलोचन केले.