For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेसलर जॉन सीनाचा WWE ला अलविदा

06:00 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेसलर जॉन सीनाचा  wwe ला अलविदा
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE)िं चा दिग्गज कुस्तीपटू ‘जॉन सीना’ लवकरच आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अंत करणार आहे. जॉन सीनानं WWE च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे इन-रिंग स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली. तो 2025 मध्ये WWE चा निरोप घेईल. 16 वेळच्या विश्वविजेत्याने अचानक निवृत्ती घेतल्याने त्याचे चाहते मात्र कमालीचे निराश झाले.

हाफ थ्री फोर्थ.. विना कॉलरचा टी शर्ट आणि हातात दोन बॅन्ड.. डोक्यावर ‘यू कॅन्ट सी मी‘ असा लोगो असलेली टोपी.. पिळदार शरीर अन् 56 इंचाची छाती, असं वर्णन केल्यावर एक चेहरा समोर येतो, तो जॉन सीना..! 2002 मध्ये वर्ल्ड रेसलिंगमध्ये पदार्पण केलेल्या जॉनने तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Advertisement

कॅनडातील शो दरम्यान जॉन सिना म्हणाला, मी वर्ल्ड रेसलिंगमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात नेटफ्लिक्सवर येत आहे, ज्यात मला सहभागी व्हायचे आहे. ही पहिलीच वेळ आहे आणि मी तिथे येईन. 2025 चा रॉयल रंबल हा माझा शेवटचा सामना असेल, असे त्याने सांगितले. जॉनने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने शो मधील उपस्थित चाहत्यांना धक्का बसला. यावेळी चाहत्यांनी त्याच्या निवृत्तीला विरोध दर्शवला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. दरम्यान, 20 वर्षाच्या कारकिर्दीत तो 16 वेळा विश्वविजेता ठरला. त्याने डब्लूडब्लूईमधील स्टार कुस्तीपटू ट्रिपल एच, द रॉक, सीएम पंक आणि रँडी ऑर्टन यांना चांगलीच टक्कर दिली. डब्ल्यूडब्ल्यूई कारकिर्दीव्यतिरिक्त जॉन सीनाने हॉलिवूडमध्येही काम केले. त्याने द इंडिपेंडंट, फास्ट एक्स आणि द सुसाइड स्क्वाड सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.

हॉलिवूडमध्ये एंट्रीची शक्यता

जॉन सीना सध्या 47 वर्षांचा आहे. त्याला WWE मध्ये परफॉर्म करण्यासोबतच त्याच्या चित्रपटांतील करिअरवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण जात होतं. या कारणामुळे त्याने WWE रिंगला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर आता तो हॉलिवूड चित्रपटात काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.