For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोचीत आज डब्ल्यूपीएलचा मिनी लिलाव

06:04 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोचीत आज डब्ल्यूपीएलचा मिनी लिलाव
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

कोची : महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) 2027 हंगामासाठी खेळाडूंचा मिनी लिलाव 28 ऑक्टोबर रोजी कोची येथे रंगणार आहे. या लिलावासाठी एकूण 146 खेळाडूंची निवड करण्यात आली असून पाच संघांमध्ये उपलब्ध असलेल्या 27 जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. यामध्ये 119 भारतीय आणि 27 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह युवा क्रिकेटपटूंनाही या लिलावातून संधी मिळण्याची शक्मयता आहे. संघ व्यवस्थापनांना आपल्या गरजेनुसार फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाकडेही चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. स्मृती मानधना, रिचा घोष आणि एलिस पेरी यांसारख्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या आरसीबीकडे लिलावासाठी 1.15 कोटी ऊपये शिल्लक असून पाच जागा भरायच्या आहेत. त्यामुळे मर्यादित रकमेत योग्य खेळाडू निवडण्याचे आव्हान संघासमोर असेल. यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक 3.75 कोटी ऊपये शिल्लक आहेत, तर गुजरात जायंट्सकडे 1.25 कोटी, दिल्ली पॅपिटल्सकडे 1.10 कोटी आणि मुंबई इंडियन्सकडे 90 लाख ऊपये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाची रणनीती आणि खेळाडूंसाठी होणारी बोली उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

Advertisement

इंग्लंडची सोफिया डंकले आणि ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिन्यू यांनी प्रत्येकी 50 लाख ऊपये मूळ किमतीत नोंदणी केली आहे. भारतीय खेळाडू जी. कमलिनी आणि किरण नवगिरे यांच्यासह काही खेळाडूंनीही आकर्षक मूळ किंमत निश्चित केली आहे. या लिलावातून कोणत्या खेळाडूला मोठी बोली मिळते आणि कोणता संघ सर्वाधिक फायदेशीर खरेदी करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.  डब्ल्यूपीएल 2027 चा हंगाम 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान होणार असल्याने लिलावातील निवडी आगामी स्पर्धेसाठी संघांची ताकद निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

Advertisement
Tags :

.