कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : अबब ! सोलापूर बाजारात भाज्यांचे दर कडाडले

05:01 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                      सोलापुरात भाजीबाजारात भाववाढ!

Advertisement

सोलापूर : बाजारात भाज्यांची आवक मंदावल्याने काही भाज्यांचे दर वधारले आहेत. तर गवार, वांगी, भेंडी तसेच काकडी या भाज्या चांगल्याच भाव खात आहेत. तर टोमॅटो, कोथिंबीर, कोबी या भाज्या मात्र स्वस्त मिळत आहेत. तसेच पालेभाज्यांचे दर मात्र अद्यापही 'जैसे थे' च आहेत.

Advertisement

अतिवृष्टीमुळे भाजारात सर्वच भाज्यांची आवक सध्या मंदावली आहे. सर्वात कमी आवक ही गवारची होत असल्याने गवार क्विंटलचा भाव सध्या ठोकमध्ये दहा हजाराच्यावर गेला आहे. त्याखालोखाल भेंडी व वांगी याचा भाव किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दरात मिळत आहेत. कोथिंबीर ही सुध्दा प्रति जुडी दहा ते ३० रुपये दराने मिळत आहे. तसेच सर्वच पालेभाज्या मात्र पाच ते पंधरा रुपये प्रति जुडी दरात मिळता आहेत. सध्या सफरचंद व सीताफळ या फळांची आवक बाजारात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या दोन्ही फळांचे दर सध्या स्थिरच आहेत.डाळींब मात्र सध्या १५ हजाराचा टप्पा पार केला आहे.

बाजार समितीकडून आलेले बाजारभाव किमान व कमालमध्ये पुढीलप्रमाणे:

कारली : १००० ते ३०००, वांगी १०० ते ५०००, कोबी : ६०० ते १४००, ढोबळी मिरची : १००० ते ४५००, गाजर ८०० ते ५०००, कोथिंबीर ५०० ते १४०० काकडी : १००० ते ८०००, प्लॉवर : ७२० ते २२४०, लसूण (सुका): ३००० ते ८०००, घेवडा ३५०० ते ४५००, मिरची हिरवी २०० ते ३६००, मिरची लाल : १३००० ते १४६००, गवार ३००० ते १०५००, भेड़ी: १००० ते ६०००, लिंबू : ३०० ते २५००, कांदा (लाल) : १०० ते २४००, कांदा (पांढरा) २०० ते ३१००, बटाटा ११०० ते १९५०, दोडका (शिराळी): १००० ते ६०००, टोमॅटो (वैशाली): २०० ते १८००, बीट १२०० ते २५०० पालेभाज्या संभर जुडीचा भाव पालक ५०० ते ८००, तांदुळसा : ६०० ते १०००, शेपू : ६०० ते ११००, राजगिरा ६०० ते ६००, मेथी भाजी: ८०० ते १६००, कांदा पात: ५०० ते १०००, चाकवत ११०० ते १२००, फळे क्विंटलचा भाव सफरचंद ३५०० ते १२०००, बोर १००० ते २२५०, सिताफळ ५०० ते ११०००, द्राक्ष (लोकल) १००० ते १०००, पेरु: ५०० ते १५००, खरबुज : १००० ते ४०००, मोरांबी १००० ते २०००, पपई ५०० ते १०००, डाळीब : ८०० ते १५०००, भुसार माल क्विंटलचा भाव गहू (शरबती) २६६५ ते ३८६५. ज्वारी (मालदांडी) ३१७५ ते ३५९५, तांदूळ (मथुरा) ३५२० ते ७३२०, सोयाबीन: ३००० ते ४४६०

Advertisement
Tags :
#BhendiPrice#solapur news#tarun_bharat_news#tarunbharatSocialMediaSolapurMarketvegetable priceVegetablePrices
Next Article