For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबब ! करडीगुद्दीत आढळला 14 फुटी अजगर

09:51 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अबब   करडीगुद्दीत आढळला 14 फुटी अजगर
Advertisement

सांबरा : करडीगुद्दी (ता. बेळगाव) येथे 14 फुटी अजगर साप आढळला असून, सांबरा येथील सर्पमित्र सचिन चिंगळी यांनी सापाला शिताफीने पकडले. बुधवार दि. 30 रोजी करडीगुद्दी शिवारात सोयाबीन काढणीचे काम सुरू होते. यावेळी काही शेतकऱ्यांना अजगर सापाचे दर्शन झाले. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी लगेच सांबरा येथील सर्पमित्र सचिन चिंगळी यांना सापाबद्दलची माहिती दिली. लागलीच सचिन चिंगळी व सहकारी त्या शिवारात दाखल झाले व अजगर सापाला शिताफीने पकडले. या सापाची लांबी सुमारे 14 फूट असून, पूर्वभागात सापडलेला सर्वात मोठा अजगर साप असल्याचे सर्पमित्र सचिन चिंगळी यांनी सांगितले. यापूर्वी खनगाव येथे अकरा फूट व वायूदल केंद्र येथे तेरा फुटाचा अजगर साप आढळला होता. त्यामुळे अजगर सापाबद्दल या भागात कुतूहल निर्माण झाले आहे. सर्पमित्र सचिन चिंगळी यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सापाला अरण्य प्रदेशात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले.

Advertisement

Advertisement
Tags :

.