For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

लोणावळ्यात धूम स्टाईलने लांबवले 16.50 लाखांचे दागिने

01:15 PM Sep 24, 2023 IST | Abhijeet Khandekar
लोणावळ्यात धूम स्टाईलने लांबवले 16 50 लाखांचे दागिने

लोणावळा : लोणावळ्यात दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी दोन महिलांच्या गळ्यातील 16.50 लाखांचे दागिने हिसकावून नेले. शामल दिपक गोणते (रा. लोणावळा गावठाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये भादंवी कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास गोणते ह्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील गंठण, शाही हार व मणी मंगळसूत्र असा सुमारे साडेतेरा ते चौदा तोळे वजनाचा (6.75000) रूपये किंमतीचा ऐवज हिसका देऊन चोरून नेला. अशीच दुसरी घटना तुंगार्ली इंदिरानगर भागात घडली. याठिकाणी लक्ष्मी शिवलिंग दळवी (वय 47 वर्ष रा. इंदिरानंगर न्यु तुंगार्ली, लोणावळा) या ब्रिजेश हॉटेल ते इंदिरानगर रोडवर इको गाडीमध्ये बसल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरटय़ांनी गळयातील गंठण, शाही हार, मणीमंगळसुत्र असा एकुण 9,75000 ऐवज चोरुन नेला.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी अज्ञात चोटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.