जोतिबाची फळांच्या आरासीत पुजा
कोल्हापूर :
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दख्खनचा राजा श्री जोतिबांची आज मंगळवारी मकर संक्रात निमित्त फळाची आरास करून सुंदर आकर्षक सुवर्णालंकारीत बैठी महापुजा बांधण्यात आली ,यावेळी श्री स महाभिषेक, महा पोषक , महानैवेद्य ,तसेच विविध धार्मिक विधी करण्यात आली.
यावेळी मोसंबी रामफळे छपरचंद संत्रि आनानस द्राक्षे सिताफळे डारगन टरबुस बोरे केळे व अन्य फळे स्वखर्चाने आणून व नियोजन करून श्री जोतिबा देवाचे पुजारी संतोष झुगर यांनी जोतिबा मंदिर परिसरात आकर्षक आरास करून श्री जोतिबा देवाची महापूजा बाधण्यात आली होती.
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची विविध रूपातील म्हणजे श्रीकृष्ण रूपातील, शंकराच्या रूपातील ,विष्णूच्या रूपातील व श्री रामाच्या रुपातील व विविध देवतांच्या रूपातील आकर्षक महापूजा बांधली जाते , कधी बैठी तर कधी खडी अशी विविध रूपातील महापूजा श्री जोतिबाची बांधली जाते , या बरोबरच भोगी महापूजा वेळी सर्व पदार्थ पुढे ठेवून पूजा बांधली जाते तसेच प्रत्येक एकादशी निमित्त हमखास विठ्ठल रूपातील महापूजा बांधली जाते या रुढी परंपरेनुसार आजही,रूढी परंपरेनुसार मकर संक्रांती निमित्त श्री जोतिबा देवाची राजेशाही रुपातील व फळाच्या आरासी मधील आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती ,ही पूजा श्रीचे पुजारी राजाराम चौगले , संतोष झुगर देवराज मिटके , ,आंकुश दादर्णे प्रकाश सांगळे . दिनकर चौगले गणेश झुगर , सचिन चौगले , ऋषिकेश सांगळे शनतूनू नवाळे गणेश बुणे , गणेश दादर्ने , वेभव झुगर, , प्रमोद मिटके यांनी बांधली होती.
आज मकर संक्रात असल्यामुळे असंख्य भाविक भक्तांनी श्री जोतिबा देवाची पुजा अर्चा धार्मिक विधी करून दर्शन घेतले ,यावेळी फळाच्या आकर्षक आरासी मधील जोतिबा देवाची सुंदर महापुजा असल्यामुळे श्री जोतिबा देवाची महापुजा पाहण्यासाठी भक्तांनी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी केली होती ,दरम्यान आज श्री बरोबर नंदी महादेव चोपडाई काळभैरव यमाई दत्त रामलिंग देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती, यावेळी मंदिर परिसरात विविध धार्मिक सोहळे, उत्सव व भजन व किर्तन करण्यात आले आहे.