For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पैसे मोजून आरोग्याशी खेळ? नामांकित ब्रँडच्या बिस्कीट पुड्यात अळ्या सापडल्याने इंदापुरात खळबळ! पहा व्हिडिओ

04:13 PM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
पैसे मोजून आरोग्याशी खेळ  नामांकित ब्रँडच्या बिस्कीट पुड्यात अळ्या सापडल्याने इंदापुरात खळबळ  पहा व्हिडिओ
Advertisement

इंदापूर :  इंदापूर शहरातील इंद्रेश्वर नगर, कालठण रोड परिसरातील एका रिटेल दुकानातून खरेदी केलेल्या नामांकित कंपनीच्या बिस्कीट पुड्यात जिवंत अळ्या आणि किडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने स्थानिक रिटेल दुकानातून बिस्कीटचा पुडा खरेदी केला होता. घरी आल्यानंतर बिस्कीट खाण्यासाठी पुडा उघडला असता, त्यामध्ये जिवंत अळ्या आणि किडे असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला.

खाद्यपदार्थात अशा प्रकारे अळ्या-किडे आढळणे ही गंभीर बाब असून, उत्पादनाच्या साठवणुकीपासून ते विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Advertisement

घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित उत्पादक कंपनीच्या साठ्याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, संबंधित बिस्कीट पुड्याचा उत्पादन क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन व मुदतबाह्य तारीख यांची तपासणी करून दोष नेमका कुठल्या टप्प्यावर झाला, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. FDAच्या तपासणीनंतर या प्रकरणाचे नेमके तथ्य समोर येण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.