जगातील सर्वात जुन्या पिरॅमिडचा लागला शोध
जमिनीत आहे संचरना, बहुमजली इमारतीइतकी खोली
पुरातत्व तज्ञांनी जगातील सर्वात जुना पिरॅमिड शोधून काढला आहे. हा पिरॅमिड इंडोनशियाच्या जावा बेटावर लाव्हारसाच्या पर्वताच्या आत 98 फूट खोलवर आहे. याची खोली भूमिगत बहुमजली इमारतीइतकी आहे. याचे नाव गुनुंग पदांग पिरॅमिड आहे. याच्या कार्बन डेटिंगद्वारे हा पिरॅमिड 16 हजार वर्षांपेक्षा अधिक जुना असल्याचे आढळून आले आहे.
गुनुंगल पदांक पिरॅमिडचा शोध डच संशोधकांनी लावला आहे. या प्राचीन ठिकाणाच्या अलिकडे पार पडलेल्या रेडिओकार्बन डेटिंग तपासणीतून चकित करणारी माहिती समोर आली आहे. हा पिरॅमिड स्वत:च्या आकारातील सर्वात जुना ज्ञान मानवनिर्मित पिरॅमिड देखील असू शकतो. परीक्षणांमध्ये
पिरॅमिडच्या प्रारंभिक निर्मितीचा शोध लागला आहे. यात पायऱ्या एंडेसाइट लावातून तयार करण्यात आल्या होत्या, त्या 16 हजार वर्षांपूर्वी अखेरच्या हिमयुगादरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ गुनुंग पदांग पिरॅमिड इजिप्तमधील गीजाच्या सर्व महान स्मारक आणि पिरॅमिड्सपेक्षा नव्हे तर इंग्लंडच्या स्टोनहेंजपेक्षाही 10 हजार वर्षे जुना आहे.
गुनुंग पदांग पिरॅमिडची निर्मिती करणाऱ्या हंटर-गॅदर्सनी अत्यंत कुशलपणे याची निर्मिती केली होती. हा पिरॅमिड त्यांच्या स्थापत्यकलेला दर्शविणारा आहे. इंडोनेशियातील पिरॅमिडचा पहिला आणि सर्वात खोल स्तर तेथील थंड लाव्हारसाच्या प्रवाहाने तयार करण्यात आला होता असे संशोधकांना आढळून आले आहे. गुनुंग पदांग पिरॅमिड तुर्कियेत शोधले गेलेल्या गोबकली टेप ‘मेगालिथ’पेक्षाही हजारो वर्षे जुना असू शकतो. तो जगातील सर्वात जुन्या पुरातत्व स्थळाच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या प्राचीन पिरॅमिडच्या संरचनेच्या रहस्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील आहेत. याकरता त्यांनी सब-सरफेस इमेजेस, कोर ड्रिलिंग अणि ट्रेंच उत्खनन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यातून संशोधकांनी या पिरॅमिडविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. हा पिरॅमिड सर्वात खालच्या स्तरापासून 30 मीटरपर्यंत फैलावलेला आहे.